नवी दिल्लीः १ ऑक्टोबर रोजी तमिळ चित्रपटातील महान अभिनेता सिवाजी गणेशन यांची ९३ वी जयंती आहे. तमिळ चित्रपटात त्यांच्या अतुल्य योगदानाबद्दल गुगलने एक खास डुडल साकारून त्यांना अभिवादन केले आहे. गुगलच्या या डुडलला बेंगळुरूच्या नुपुर राजेश चोकसी यांनी बनवले आहे. आज सकाळ पासून ट्विटरवर सिवाजी गणेशन यांचे डुडल ट्रेंड करीत आहे. सिवाजी गणेशन यांचे नातू प्रसिद्ध तमिळ अभिनेता विक्रम प्रभू यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून गुगलचे हे डुडल शेयर केले आहे. डुडलसाठी त्यांनी गुगल इंडिया आणि डुडल साकारणाऱ्या नुपुर राजेश चोकसी यांचे आभार मानले आहे. सिवाजी गणेशन यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२८ रोज मद्रास पेसिडेंसी (आजचे तामिळनाडू) मधील विल्लूपुरम मध्ये झाला होता. त्यांचे नाव गणेशमूर्ती ठेवण्यात आले होते. लहाणपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अवघ्या ७ वर्षाचे असताना त्यांनी घर सोडून थिएटर ग्रुपशी जोडले गेले. १९४५ मध्ये गणेशमूर्ती यांनी "शिवाजी कांडा हिंदू राज्यम" या नाटकात मराठा शासक शिवाजी महाराजाची भूमिका साकारली होती. शिवाजी महाराज यांची भूमिका इतकी जीवंत साकारली की, त्यानंतर ते सिवाजी गणेशन म्हणून ओळखले जावू लागले. भारतीय सिनेमाच्या विकासात शिवाजी गणेशन यांचे मोठे योगदान आहे. ते फक्त तमिळ सिनेमापर्यंत मर्यादीत राहिले नाही. त्यांनी तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी सारख्या भाषेतील चित्रपटात काम केले. जवळपास ५ दशकाच्या करिअर मध्ये त्यांनी ३०० हून जास्त चित्रपटात काम केले. गणेशन तमिळ सिनेमाचे सुपरस्टार त्रिमूर्ती पैकी एक होते. तमिळ सिनेमात त्यांचे जॅमिनी आणि एमजीआर यांचे तेच स्थान आहे. जे हिंदी सिनेमात राज कपूर दिलीप कुमार आणि देव आनंद यांचे आहे. १९६० मध्ये "वीरपांडिया कट्टाबोम्मन"साठी त्यांना मिश्र मध्ये एफ्रो-एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेताचा पुरस्कार मिळाला. कोणत्याही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. आपल्या मेथड अॅक्टिंगसाठी प्रसिद्ध शिवाजी गणेशन यांना Los Angeles Times ने भारताचा "भारताचा मार्लन ब्रांडो" असे संबोधले. १९९९ मध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता. ७२ व्या वर्षी २१ जुलै २००१ रोजी त्यांचे निधन झाले. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AYxNzP