मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड स्टार चा मुलगा ला रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली. एनसीबीने गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा घालून ड्रग्ज पार्टीचा भांडाफोड केला होता. त्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनसोबतच अन्य सात जणांना अटक केली. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेकजण शाहरुखला पाठींबा देण्यासाठी पुढे आल्याचे दिसून आले. यात प्रसिद्ध चित्रपट निर्माते यांचाही समावेश आहे. त्यांनी या संपूर्ण वादावर ट्विटरच्या माध्यमातून शाहरुख खानचे समर्थन केले. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहीले की, 'एका पालकासाठी हे खूप त्रासदायक असते जेव्हा त्याचा मुलगा अडचणीत असतो.' मेहता यांनी ट्वीटमध्ये काय म्हटले मेहता यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, 'एक वडिलांसाठी त्यांचा मुलगा अडचणीत आहे, हे खूपच त्रासादायक असते. हे तेव्हा खूपच त्रासदायक होते, जेव्हा लोक कायद्याच्याही अगोदर निर्णय द्यायला सुरुवात करतात. हे पालकासोबतच मुल आणि पालक यांच्यातील नात्याचा अपमान करणारे आणि चुकीचे आहे. शाहरुख, मी तुझ्यासोबत आहे.' सलमान खानने गाठले शाहरुखचे घर या अगोदर अभिनेता सलमान खान रविवारी रात्री शाहरुखच्या घरी दिसल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही तर पूजा भट्टने देखील ट्विटरद्वारे शाहरुखला रविवारी पाठींबा दिला होता. तिने लिहिले की, 'मी तुझ्यासोबत उभी आहे शाहरुख. असे नाहीये की, तुला याची गरज आहे. मात्र मी उभी आहे. ही वेळ सुद्धा निघून जाईल.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WFHa8H