Full Width(True/False)

गुड न्युज ! Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम भारतात लाँच, 'असे' करा अपडेट डाउनलोड, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ने भारतीय युजर्ससाठी नवीन Windows 11 रोलआउट करायला सुरुवात केली असून युजर्सना प्रथम या नवीन ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट मिळेल. यासह, नवीन लाँच केलेल्या लॅपटॉपमध्ये ला सपोर्ट असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनीने Windows 11 डिव्हाइसेस पूर्व-स्थापित करण्यासाठी Asus, HP, Lenovo, Acer आणि Dell सोबत भागीदारी केली आहे. वाचा: मायक्रोसॉफ्ट नुसार, Windows 11 डाउनलोड आणि स्थापित केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर परवान्याच्या अटी स्वीकाराव्या लागतील. त्यानंतर डाउनलोड प्रक्रिया सुरू होईल. Windows 11 ची वैशिष्ट्ये : Microsoft ची नवीन Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम नवीन यूजर इंटरफेससह येते. यात अगदी नवीन विंडोज स्टोअर, सेंटर टास्कबार आणि स्टार्ट मेनू बटण आहे. कॅलेंडर, हवामान आणि क्रीडा लीडरबोर्ड सारखे विजेट्स या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नवीन डिझाइनसह उपलब्ध असतील. याशिवाय, सिस्टम ट्रे, नोटिफिकेशन्स आणि क्विक अॅक्शन UI मध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन ऑपरेटिंग सिस्टमद्वारे युजर्स त्यांचे काम अधिक वेगाने करू शकतील. Windows 11 कसे डाउनलोड करावे ? जर तुमचा संगणक Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असेल, तर तुम्ही PC हेल्थ चेक अॅपद्वारे तुमचे डिव्हाइस Windows 11 ला सपोर्ट करेल की नाही हे तपासू शकता. या व्यतिरिक्त, विंडोज अपडेट सेटिंग्ज वर जाऊन Windows 11 चे अपडेट देखील तपासू शकता. यासाठी सेटिंग्ज> अपडेट आणि सिक्युरिटी> विंडोज अपडेट वर जा आणि "अपडेट फॉर अपडेट्स" वर क्लिक करा. मायक्रोसॉफ्टने ऑफिस २०२१ आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ देखील सादर केले असून मायक्रोसॉफ्ट ३६५ ची डिझाईन उत्तम आहे. या Open Document Format मध्ये १.३ जोडले गेले आहे. तर, दुसरीकडे, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, वननोट आणि टीम ऑफिस २०२१ मध्ये समर्थित असतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A5RZ1y