Full Width(True/False)

स्मार्टफोन्सवर ९,००० तर लेटेस्ट स्मार्ट TV वर ११,००० रुपयांपर्यंतचा जबरदस्त डिस्काउंट, पाहा ऑफर्स-लिस्ट

नवी दिल्ली: Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु झाला असून यावेळी यात Xiaomi 11 Lite NE 5G, Samsung Galaxy M52 5G, Redmi Note 10 Lite, iQOO Z5 5G, Oppo A55, Redmi Smart TV 32-inch आणि Acer Smart LED TV 32-inch, जे पहिल्यांदा बाजारात आले आहे त्यावर आकर्षक ऑफर्स मिळत आहे. जाणून घ्या सविस्तर. वाचा: Xiaomi 11 Lite NE 5G: ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची एमआरपी ३१,९९९ रुपये असून हे डिव्हाइस ५,००० रुपयांच्या सूटसह २६,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. १,२७१ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर देखील खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय एचडीएफसी बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यावर १० टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. त्याचबरोबर १५,८८७ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. यासह, अमेझॉनचे कूपन लागू करून १,५०० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. Samsung Galaxy M52 5G फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची एमआरपी ३४,९९९ रुपये आहे. ९,००० रुपयांच्या सूटसह ते २५,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तसेच १,२२४ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर देखील तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. याशिवाय, एचडीएफसी बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यावर १० टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. त्याचबरोबर १५,८८७ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. यासह, अमेझॉनचे कूपन लागू करून अतिरिक्त १,००० रुपयांची सूट देखील तुम्ही मिळवू शकता. iQOO Z5 5G: ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची एमआरपी २९,९९० रुपये असून हे डिव्हाइस ६,००० रुपयांच्या सूटसह २३,९९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तसेच, १,१२९ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर देखील खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय ,एचडीएफसी बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यावर १० टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. त्याचबरोबर १३,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही यावर दिली जात आहे. यासह, अमेझॉनचे कूपन लागू करून १,५०० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. Oppo A55: ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची एमआरपी १८,९९० रुपये असून हे डिव्हाइस ३,५०० रुपयांच्या सूटसह १५,४९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तसेच, ७२९ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवरही तुम्ही ते खरेदी करू शकता. याशिवाय, एचडीएफसी बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यावर १० टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. त्याचबरोबर १३,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही यावर दिली जात आहे. यासह, अमेझॉनचे कूपन लागू करून १,५०० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता. Redmi Smart Tv 32-inch या ३२ इंचाच्या HD रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्हीची MRP २४,९९९ रुपये असून हे १०,५०० रुपयांच्या सूटसह १४,४९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तसेच,६८३ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर देखील खरेदी केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, एचडीएफसी बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यावर १,५०० रुपयांची फ्लॅट सवलत दिली जाईल. त्याचबरोबर २,१६० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही यावर दिली जात आहे. Acer Smart LED TV 32-inch: या ३२ इंचाच्या HD रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्हीची MRP १९,९९० रुपये असून ४,९९१ रुपयांच्या सूटसह १४,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. हे तसेच, ७०६ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर देखील तुम्ही हा टीव्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर, २,१६० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. वाचा: ' वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A5KfN6