मुंबई : '' कार्यक्रमाच्या आज प्रसारित होणाऱ्या भागामध्ये 'बिग बॉसची चावडी' भरणार आहे. या चावडीवर गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात जे काही टास्क स्पर्धकांना दिले होते, त्यात ते कसे खेळले, कसे वागले याचा ऊहापोह या शनिवारच्या चावडीवर केला जातो. आज भरल्या गेलेल्या चावडीवर यांनी गेल्या आठवड्यात घराचा कॅप्टन असलेल्या ची चांगलीच कानउघडणी केली. इतकेच नाही तर तो आतापर्यंत या घरातील सर्वात वाईट संचालक असल्याचे सांगत त्याचे कान उपटले आहेत. सरत्या आठवड्यामध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना 'हल्ला बोल' हा टास्क खेळण्यासाठी दिला होता. या टास्कचे संचालक म्हणून घराचा कॅप्टन उत्कर्षला नेमले होते. हा टास्क जोडीने खेळायचा होता आणि त्यासाठी घरातील सदस्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली होती. ए गटामध्ये गायत्री-जय, मीरा-स्नेहा, दादूस-तृप्ती आणि उत्कर्ष-अक्षय होते. तर बी गटामध्ये विशाल-विकास, अविष्कार-मीनल-शिवलीला आणि सुरेखा- सोनाली असे सदस्य होते. 'हल्ला बोल' या टास्कसाठी आविष्कारला संचालक म्हणून बिग बॉसने नेमले होते. परंतु हा टास्क जेव्हा खेळण्यात आला तेव्हा त्याने त्याच्या गटाची बाजू घेत निर्णय घेतले होते. त्याबद्दल सोशल मीडियावरही तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. उत्कर्षला धरले धारेवर आजच्या भागाचा प्रोमो चॅनेलच्या इन्स्टाग्रामवरून शेअर झाला आहे. त्या प्रोमोमध्ये उत्कर्षच्या या पक्षपाती वागण्याबद्दल शनिवारच्या चावडीवर मांजरेकर यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केलेली दिसत आहे. उत्कर्षला मांजरेकर म्हणतात, 'उत्कर्ष, तू समुद्रात पोहायला गेला तेव्हा तुला कधी त्रास झाला होता का रे?' त्यावर उत्कर्ष स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला मांजरेकर मध्येच थांबवतात आणि म्हणतात, 'मीठाच्या पाण्याने टाकणे हे चुकीचे नव्हते. जर तुला मिरचीची धुरी देणे चुकीचे वाटत नाही तर मग मीठाचे पाणी टाकण्यापासून तू का अडवलेस? तू सगळ्यात पार्शिअल संचालक आहेस...' असे म्हणत उत्कर्षची चांगलीच कानउघडणी केली आहे. सुरेखा कुडची तू इकडची की तिकडची गं?याच बिग बॉसच्या चावडीवर मांजरेकर यांनी कार्यक्रमातील स्पर्धक सुरेखा कुडची हिच्या वागण्यावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरेखा बी गटात असूनही त्यांनी अनेकदा ए गटाला पाठिंबा दिलेला होता. तिच्या या वागण्याबद्दल मांजरेकरांनी तिची देखील कानउघडणी केली आहे. ते तिला म्हणाले, 'सुरेखा कुडची, तू इकडची की तिकडची' सुरेखा कुडची, उत्कर्ष शिंदे यांच्याबरोबरच आणखी कुणाकुणाची मांजरेकरांनी कानउघडणी केली, कुणाचे कौतुक केले हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे. दरम्यान, चॅनेलच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा प्रोमो शेअर झाल्यानंतर युझर्सनी भरभरून कॉमेन्ट करायला सुरुवात केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3B4pDWB