मुंबई: राष्ट्रपिता यांच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक यांनी त्यांचया आगामी 'गोडसे' या सिनेमाची घोषणा केली आहे. मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो आणि टीझर शेअर करताना त्यांनी एक पोस्ट केली आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची घोषणा करत युझर्सनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली. महेश मांजरेकर यांनी सिनेमाचा टीझर आणि त्याचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, 'वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा!' संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त "गोडसे" सिनेमाची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये मांजरेकर यांनी म्हटले आहे की, 'नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या स्वरुपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. माझा नेहमीच कठीण विषयांवर आणि बिनधास्त गोष्टींवर विश्वास आहे. सिनेमाचे हे कथानक अशाच पद्धतीचे आहे. महात्मा गांधींवर गोळीबार करणारी व्यक्ती ही ओळख वगळता त्यांच्याबद्दल कुणालाच जास्त माहिती नाही. त्यांची कथा सिनेमातून सांगताना, कुणालाही पाठिशी घातलेले नाही ना कुणाच्या विरोधात भाष्य केले आहे. योग्य काय अयोग्य काय आहे ते प्रेक्षकांवर आम्ही सोडले आहे,' अशा शब्दांत त्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टिंगचे काम सुरू आहे. त्यानंतर या सिनेमासाठी कलाकारांची निवड केली जाणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २०२२ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3B4h7XD