Full Width(True/False)

एनसीबीनं आर्यनला अटक केल्यानंतर शाहरूख खान घेऊ शकतो हा मोठा निर्णय

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव एका रेव्ह पार्टीत आले आहे. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा परिणाम शाहरूख खानच्या व्यावसायिक जीवनावरही झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख खान आपल्या आगामी पठाण या चित्रपटाच्या शुटिंगसाठी स्पेनला रवाना होणार होता. स्पेनमध्ये शाहरूख आणि दीपिका पादुकोण यांच्या गाण्याची शुटिंग नियोजित करण्यात आली होती. परंतु आर्यन खानचे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शाहरूख खान आपली शुटींग लांबणीवर टाकण्याची किंवा रद्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्रूझमधील रेव्ह पार्टीमध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटसुद्धा सहभागी झाला होता. अरबाज सेठ मर्चंट याचे अमली पदार्थांशी जास्त जवळचे नाते असल्याचे बोलले जात आहे. अरबाज सेठ मर्चंट आणि चांगले मित्र आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे सध्या अरबाज मर्चंटची चौकशी करत आहे, तर आर्यन खानची चौकशी व्ही. व्ही. एस. सिंह करत आहे. आर्यन खान नेहमीच आपले खासगी आयुष्य एकांतात जगणे पसंद करतो. चित्रपटसृष्टीत होणाऱ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये आर्यनचा खूपच कमी सहभाग असतो. त्यामुळे क्रूझवर सुरू असलेल्या पार्टीत आर्यन खानचे नाव समोर आल्यामुळे बॉलिवूडसह त्याचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख खान एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून प्रत्येक मिनिटाची माहिती घेत आहे. या प्रकरणी शाहरूख खान किंवा त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3opBbQZ