Full Width(True/False)

महेश मांजरेकर आहे तरी कोण? 'गोडसे' चित्रपटाच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड भडकले

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारे लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांनी २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी त्यांचा नवाकोरा चित्रपट '' ची घोषणा केली. सोबतच एक व्हिडीओ आणि पोस्टर प्रदर्शित करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. मात्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांना मांजरेकरांच्या चित्रपटाचा हा विषय फारसा पसंत पडलेला दिसत नाही. 'गोडसे' चित्रपटावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. आव्हाड यांनी ट्विट करत चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. मांजरेकर यांचा गोडसेंवरील चित्रपट आव्हाडांना पसंत पडलेला नाही. ट्विट करत आव्हाडांनी महेश मांजरेकर कोण आहेत, ते फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी हे सगळं करत असल्याचं म्हटलं आहे. आव्हाड यांनी ट्विट करत लिहिलं, 'महेश मांजरेकर कोण आहे? त्यांचं भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान काय आहे? लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरेकर अशा प्रकारचं नाटक करत आहेत.' हे ट्विट करत आव्हाडांनी मांजरेकरांवर टीका केली आहे. आव्हाडांच्या या ट्विटवर मांजरेकरांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 'गोडसे' चित्रपटाच्या घोषणेसोबत मांजरेकरांनी एक टिझर प्रदर्शित केला. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, 'यापूर्वी कुणीही जे सांगण्याचं धाडस केलं नाही ते ऐकण्यासाठी सज्ज व्हा. नथूराम गोडसे यांची ही कथा माझ्या हृदयाच्या फार जवळ आहे. अशा चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी खूप हिंम्मत लागते. कठीण विषय आणि बिनधास्त गोष्टींवर माझा नेहमीच विश्वास आहे. महात्मा गांधींवर गोळी झाडणारा एक माणूस या व्यतिरिक्त कुणालाही गोडसेंबद्दल माहिती नाही. योग्य काय आणि अयोग्य काय हे प्रेक्षकांवर सोडलेलं आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a18267