Full Width(True/False)

घटस्फोटानंतर सामंथाने नाकारली तब्बल २०० कोटींची पोटगी, कारण वाचून कराल कौतुक

मुंबई- 'फॅमिली मॅन २' मधून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ पाडणारी दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अभिनेता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला. गेले काही महिने सोशल मीडियावर सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. त्यांना काही वेळेस वकिलांकडे जाताना देखील पाहण्यात आलं होतं. परंतु, सोशल मीडियावर पोस्ट करत सामंथाने या चर्चांना पूर्णविराम दिला. सामंथाच्या घटस्पोटाच्या निर्णयाने चाहते दुखावले आहेत. परंतु, आता सामंथाने अक्किनेनी कुटुंबाकडून मिळणारी पोटगी घेण्यासही नकार दिल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर इतर महिलांप्रमाणे अक्किनेनी कुटुंबाकडून सामंथाला देखील पोटगी देण्यात येत होती. अक्किनेनी कुटुंबाने सामंथाला तब्बल २०० कोटी रुपयांची पोटगी देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, सामंथाने नम्रपणे ही पोटगी घेण्यास नकार दिला आहे. सामंथा एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सामंथाने तिच्या अभिनयाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं. त्यामुळे आपण काम करून आपलं पोट सहजपणे भरू शकतो. आपल्याला पोटगीची गरज नसल्याचं सामंथाचं म्हणणं आहे. आपण फक्त प्रेमासाठी नागा चैतन्यासोबत लग्न केलं. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्यासाठी लग्नगाठ बांधली परंतु, आता चित्र पूर्ण बदललं आहे. आपल्याला या कुटुंबाकडून पैसे नको असल्याचं सामंथाने स्पष्ट केलं. नेटकरीही सामंथाच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत. सामंथा खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभी आहे. तिच्यासाठी पैसे महत्वाचे असते तर तिने घटस्फोट घेतला नसता असं म्हणत नेटकऱ्यांनी सामंथाचं कौतुक केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oy85Pl