मुंबई: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचं निधन झालं. दिग्दर्शक आणि निर्माता हंसल मेहता यांनी ही दु:खत बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. युसूफ हुसैन यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. युसूफ हुसैन यांच्या अनेक भूमिका गाजल्या. त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये तसंच चित्रपटात काम केलं.‘दिल चाहता है’, ‘’, ‘दबंग ३’, ‘धूम’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.हंसल मेहता यांनी एक भावनीक पोस्ट शेअर करत युसूफ हुसैन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काय म्हणाले हंसल मेहता?मी शाहिद या चित्रपटाचं शूटिंग करत होते. दोन शेड्युल पूर्ण केले होते. त्यानंतर एक निर्माता म्हणून मला अनेक अचडणी आल्या.निर्माता म्हणून मी संपलोच होतो. त्याच अडचणीच्या वेळी युसूफ हुसैन माझ्याजवळ आले होते. ते म्हणाले की, माझ्याकडं एक फिक्स्ड डिपॉझिट आहे. सध्या मला त्याचा काही उपयोग होत नाहीए. तुला गरज असेल तर... असं म्हणत त्यांनी चेकवर सही केली. असा हा भावुक अनुभव हंसल मेहता यांनी शेअर केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BumDCy