नवी दिल्लीः Xiaomi चा सब-ब्रँड Redmi आपली नवीन Redmi K50 सीरीज वर सध्या जोरदार काम करीत आहे. त्यावरून अंदाज लावला जात आहे की, लाइनअप मध्ये तीन मॉडलचा समावेश असणार आहे. यात Redmi K50, Redmi K50 Pro, आणि Redmi K50 Pro +. एक चीनी टिप्सटर ने Redmi K50 Pro + हँडसेट्चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. Redmi K50 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स टिप्सटरच्या माहितीनुसार, Redmi K50 Pro+ च्या डिस्प्ले मध्ये टॉप-सेंटर पोजिशन्ड पंच-होल असणार आहे. AMOLED पॅनेलला इन स्क्रीन फिंगरप्रिंट रिडर सोबत इंटिग्रेटेड केले जाणार आहे. K40 प्रो + प्रमाणे K50 प्रो + 120Hz रिफ्रेश रेट साठी सपोर्ट दिला जावू शकतो. Redmi K50 Pro+ ची बॅटरी आगामी स्नॅपड्रॅगन ८९८ मोबाइल प्लॅटफॉर्मच्या K50 प्रो+ ला पॉवर देण्याची शक्यता आहे. यात 5,000mAh+ ची बॅटरी दिली जावू शकते. आधीच्या लीकच्या आधारावर म्हटले जावू शकते की, 67W रॅपिड चार्जिंगचे सपोर्ट करू शकतो. Redmi K50 Pro+ चा कॅमेरा Redmi K50 Pro+ चा रियर कॅमेरा सेटअप मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि पेरिस्कोप झूम लेन्स असू शकतो. हा ट्रिपल कॅमेरा युनिट दिला जाईल. Redmi K50 लाइनअपला चीनमध्ये फेब्रुवारी २०२२ पर्यंत लाँच करण्याची शक्यता आहे. रेडमीच्या Redmi K50 मध्ये स्नॅपड्रॅगन 888 SoC असू शकतो. तर K50 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 898 SoC सोबत येवू शकतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mCpJPg