नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ने फेस्टिव्ह ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनीने प्रीपेड प्लानची घोषणा केली असून, याची सुरुवाती किंमत २४७ रुपये आहे. यातील काही प्लानमध्ये अतिरिक्त वैधता आणि अतिरिक्त डेटाचा फायदा मिळत आहे. कंपनीकडे ४९९ रुपयांचा प्लान आहे. यात प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा व ९० दिवसांची वैधता मिळत असेल. मात्र, आता प्लानमध्ये १ जीबी अतिरिक्त डेटासह ५ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. म्हणजेच, आता ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा, ९५ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० दिवसांची वैधता मिळते. वाचा: बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या प्लानसोबत २४९ रुपये आणि ३९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये देखील ५ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. २४७ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सला ५० जीबी हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. यासोबतच, अनलिमिडेट कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा यात मिळते. तसेच, Eros Now स्ट्रीमिंग बेननिफिट्स मिळेल. ६ नोव्हेंबरपर्यंत प्लान ३५ दिवस वैधतेसह येईल. BSNLच्या ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. हा प्लान देखील ३५ दिवस वैधतेसह येतो. कंपनीकडे ४८५ रुपयांचा देखील प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ९० दिवसांसाठी अनलिमिडे कॉलिंग, दररोज १.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. हा प्लान खास केरळच्या यूजर्ससाठी आहे. दरम्यान, दुसरीकडे जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. २८ दिवस वैधतेच्या या प्लानमध्ये जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uRus3x