Full Width(True/False)

ढसाढसा रडला आर्यन खान, गेल्या चार वर्षांपासून घेतोय ड्रग्ज

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो () ने अटक केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी काल दिवसभर आर्यनची चौकशी केली. त्यावेळी आर्यन अक्षरशः ढसाढसा रडत होता. तसेच या चौकशीवेळी आयनने एक मोठा खुलासा तपास अधिकाऱ्यांकडे केला. आर्यनने केला खुलासा मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझ सफारीवर श्रीमंत घरची मुले सहभागी असल्याने अमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन असल्याचा संशय एनसीबीला आला. एनसीबीने सापळा रचून या क्रूझवर प्रवेश केला आणि त्यांच्याकडू कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले. तसेच या मुलांना ताब्यात घेतले. त्यामध्ये बॉलिवूडचा सुपस्टार याचा मोठा मुलगा आर्यन खान याचा समावेश असल्याचे समोर आले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यासह दहा जणांना अटक केली. या सर्वांची चौकशी अधिकाऱ्यांनी केली. या चौकशीवेळी आयर्न ढसाढसा रडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे गेल्या चार वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत असल्याचेही त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. याप्रकरणी अटक केलेल्या सर्वांना एनसीबी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. काय सांगितले आर्यनने एनसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवेळी आर्यनने सांगितले की, केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याने ड्रग्जचे सेवन केले आहे. यामध्ये युके, दुबई या देशांचा त्याने उल्लेख केला आहे. तसेच आर्यनबरोबर अटक करण्यात आलेल्या अरबाजला तो १५ वर्षांपासून ओळखत असल्याचेही सांगितले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पुन्हा क्रुझवर छापा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी देखील एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच क्रुझवर पुन्हा एकदा छापा घातला. क्रुझवरील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. शाहरुखने आर्यनशी फोनवरून साधला संवाद एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यानंतर आर्यनच्या विरोधात आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, एनसीबी कार्यालयातील लँडलाईनवरून आर्यन आणि शाहरुख खान यांचे बोलणे झाले आहे. बॉलिवूडकरांचा खान कुटुंबाला पाठिंबा आर्यन खानला अटक झाल्याचे वृत्त आल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांनाही धक्का बसला. परंतु अनेक कलाकारांनी शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबियांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. पूजा भट्टने ट्वीट करून शाहरुखला धीर दिला. तिने म्हटले की, 'शाहरुख मी तुझ्यासोबत आहे. तुला गरज आहे म्हणून नाही तर मला तुला पाठिंबा द्यावासा वाटतो म्हणून. हा कठीण काळही निघून जाईल.' सतीश मानेशिंदे यांनी घेतले वकीलपत्र शाहरुख खान याने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांच्याकडे आर्यनची केस सोपावली आहे. आता एनसीबीने जे काही आरोप आर्यनवर लावले आहेत, त्याला सतीश मानेशिंदे न्यायालयात आज उत्तर देतील. याआधी सतीश मानेशिंदे यांनी अनेक बॉलिवडू कलाकारांचे वकीलपत्र घेतले आहे. एनसीबीचे अधिकारी ड्रग्ज पॅडलरच्या शोधात क्रुझ शिपवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत झालेल्या कारवाईबाबत मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितले की, 'या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. या मागे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्याचा शोध तर घेतला जाणार आहेच. सध्या आम्ही या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या ड्रग्ज पॅडलरचा शोध घेत आहोत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Fg9GiH