Full Width(True/False)

मस्तच! फ्लिपकार्टची खास सेवा, आधी करा शॉपिंग आणि नंतर देता येईल पैसै

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी ने सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सला कमी किंमतीत खरेदी करता येईल. मात्र, अनेकदा किंमत जास्त असल्याने आपल्याला वस्तू खरेदी करता येत नाही. यासाठी कंपनीने खास सुविधा दिली आहे. च्या माध्यमातून तुम्ही आता वस्तू खरेदी करून नंतर पैसे देऊ शकता. वाचा: आम्ही तुम्हाला Flipkart Pay Later अ‍ॅक्टिव्हेट करणे व त्याचा कसा वापर कराल, याची माहिती देत आहोत. दरम्यान, Flipkart Pay Later चा पर्याय सध्या केवळ फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठीच आहे. तुम्ही या फीचरसाठी फ्लिपकार्ट मोबाइल अ‍ॅपद्वारे अ‍ॅप्लाय करू शकता. यासाठी सर्वात प्रथम फ्लिपकार्ट अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करा. त्यानंतर अ‍ॅपमध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर माय अकाउंट पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला Flipkart Pay Later चा पर्याय दिसेल. त्यानंतर Activate Now बटन वर क्लिक करा. पुढील स्क्रीनवर पुन्हा एकदा Activate Now बटनवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. येथे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार डिटेल्सद्वारे Flipkart Pay Later KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आधारशी रजिस्टर्ड असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर Flipkart Pay Later सर्व्हिस सुरू होईल. सुरुवातीला कंपनी ५ हजार रुपये क्रेडिट लिमिट देत आहे, ही रक्कम वाढूही शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AamEuF