मुंबई : सध्या कौशल कुटुंबात प्रेमाचा मौसम आला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमप्रकरणाची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा आहे. इतकेच नाही तर या दोघांचा साखरपुडाही झाला असल्याची मध्यंतरी बातमी आली होती. परंतु ही अफवाच असल्याचे नंतर सिद्ध झाले. तरी देखील या जोडीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होतच आहे. त्यात आता विकीचा धाकटा भाऊ सनी कौशलही त्याच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे. सनी कौशलचा 'शिद्दत' हा सिनेमा १ ऑक्टोबरला ओटीटीवर रिलीज झाला. त्यामुळे ही तो चर्चेत आला आहे.परंतु त्याचे अफेअर सोबत होत असल्याने त्याची जास्त चर्चा होत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की कोण आहे ही शर्वरी वाघ? शर्वरी वाघ आणि सनी कौशलने 'द फरगॉटन आर्मी' मध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हा पासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. इतके दिवस सारे काही गपचूप सुरू होते. परंतु सनीच्या 'शिद्दत' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनींगला शर्वरी आल्यामुळे या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू झाली. इतकेच नाहीतर स्क्रिनिंगला आलेल्या फोटोग्राफर्सना शर्वरीने पोझ देऊन फोटो काढून घेतले होते. सनीने त्याच्या सिनेकरिअरला २०१० मध्ये सुरुवात केली. सुरुवातीला तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने 'सनशाईन म्युझिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स'मधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्याला अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमामुळे ओळख मिळाली. त्याशिवाय त्याने 'फॉरगॉटन आर्मी' वेबसीरिजमध्ये काम केले. या सीरिजमधील सनीच्या अभिनयाचे भरभरून कौतुक झाले. याच सीरिजमध्ये शर्वरी वाघ देखील होती. येथेच या दोघांची पहिली भेट झाली. शर्वरी ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. शर्वरीने देखील याच वेब सीरिजमधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. कोण आहे शर्वरीशर्वरी वाघ हिचा जन्म १४ जून १९९६ मध्ये मुंबईत झाला. तिने दादर येथील पारसी यूथ अॅसेम्बलीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून पदवी घेतली. शर्वरीचे वडील बिल्डर आहेत तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे. शर्वरीला कस्तुरी ही बहीण तर अर्णव हा भाऊ आहे. शर्वरीची आणखी एक ओळख म्हणजे ती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष देखील होते. शर्वरीने १६ व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये कॉलेजमध्ये असतानाच शर्वरीने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर शर्वरी अनेक जाहिरातींमध्ये काम केले. शर्वरीने जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओमधून अभिनयाचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. बॉलिवूडमध्ये शर्वरीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. तिने प्यार का पंचनामा २, बाजीराव मस्तानी, सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. शर्वरीने आणि सनी कौशलने २०२० मध्ये फिल्मफेअर मासिकासाठी फोटोशूट केले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3D8QLo5