Full Width(True/False)

क्रूझ रेव्ह पार्टीत एका व्यक्तीला सहभागी होण्यासाठी आकारण्यात आलं होतं इतकं शुल्क

मुंबई : एनसीबीने शनिवारी रात्री ‘कोर्डेलिया क्रूझ’वर छापा मारून स्टार अभिनेता शाहरुख खानच्या मुलासह आठ जणांना ताब्यात घेतले. मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या या क्रूझमध्ये हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टी सुरू होती. एनसीबीचे अधिकारी प्रवाशांच्या रूपात क्रूझमधून प्रवास करत होते. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. क्रूझवर सहभागी लोकांनी आपल्या पॅंटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडवेअरच्या शिलाईच्या भागात आणि कॉलरच्या शिलाईत ड्रग्ज लपवल्याचे समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. पार्टीचे प्रवेश शुल्क पाच लाख ! समुद्राच्या मधोमध पोलिसांचा ससेमिरा लागणार नाही, असा कयास लावून क्रूझमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ड्रग्ज पार्टीचे प्रवेश शुल्क 80 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत होते. दोन हजार प्रवासी क्षमता असलेल्या या क्रूझमध्ये एक हजारांहून कमी लोक प्रवास करत होते. पार्टीचे निमंत्रण इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरून देण्यात आले होते. त्यासाठी काही लोकांना विशेष आकर्षक किट भेट देऊन निमंत्रित करण्यात आले होते. क्रूझवरील बहुतांश लोक दिल्लीतील ! या क्रूझ शिपवर आलेले बहुतांश लोक दिल्ली येथील होते. विमानातून ते मुंबईला आले आणि नंतर क्रूझवर गेले होते. अरबाज नावाच्या व्यक्तीची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान त्याच्या बुटामध्ये ड्रग्ज आढळले होते. अरबाज हाच अभिनेत्याच्या मुलाला क्रूझवर घेऊन आला होता. क्रूझवरील लोकांना मुंबईत परत आणण्यात आले आहे. एनसीबीने अद्याप लोकांची नावे अधिकृतरित्या जाहीर केलेली नाहीत. कायदेशीर कारवाई सुरू आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3A6lgsT