Full Width(True/False)

बेस्ट डील ! ५,००० रुपयांच्या जबरदस्त डिस्काउंटसह घरी आणा 'हा' स्मार्टफोन, फीचर्स आश्चर्यचकित करणारी

नवी दिल्ली :Amazon Great Indian Festival प्राइम युजर्ससाठी Live झाला असून नेहमीप्रमाणे, या वेळी देखील सणासुदीच्या काळात, ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर अनेक गॅझेटवर प्रचंड सूट दिली जात आहे. मोठ्या ब्रॅण्ड्स त्यांच्या ऑनलाइन गॅझेटसह या ऑनलाइन विक्रीमध्ये प्रवेश करत आहेत. iQOO देखील या Festival मध्ये बरीच उत्पादने घेऊन येणाऱ्या ब्रँडपैकी एक आहे. वाचा : सर्व ब्रँड त्यांच्या उत्पादनांवर आकर्षक ऑफर देत आहेत, परंतु iQOO एका विशिष्ट उत्पादनावर सूट देत आहे. कंपनीने स्मार्टफोनवर उपलब्ध सवलत देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या सूटनंतर प्रथमच, iQOO 7 अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्याची MRP ३१,९९० रुपये असून तब्बल ५,००० रुपयांच्या सूटसह २६,९९० रुपयांमध्ये तुम्हाला हा फोन घरी आणता येणार आहे. ऑफरबद्दल जाणून घेऊया: IQOO 7 चे सर्व प्रकार विक्रीमध्ये उपलब्ध असतील. यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज प्रकार, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज प्रकार, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज प्रकार आहेत. IQOO 7 च्या सर्व प्रकारांच्या किंमतीवर ५००० रुपयांची सूट दिली जाईल. सूटनंतर त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ३१,९९० रुपयांवरून २६,९९० रुपये होईल. ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २८,९९० रुपये आणि १२ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३०,९९० रुपये असेल. असा मिळवा डिस्काउंट : IQOO 7 च्या सर्व प्रकारांना एकूण ५,००० रुपयांची सूट मिळेल. पण, ती थेट सवलत असणार नाही. ही सवलत काही ऑफरमध्ये विभागून मिळू शकते. सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमतीत थेट २,००० रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर पेमेंटसाठी किंवा ईएमआय पर्याय निवडण्यावर ३,००० रुपयांची सूट असेल. iQOO 7 मध्ये ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI चा पर्यायही तुम्हाला मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uEPmTh