Full Width(True/False)

अशी ऑफर पुन्हा मिळणे कठीणच ! १०,००० रुपयांपेक्षा कमीमध्ये iPhone खरेदी करण्याची संधी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी तुम्हाला पुन्हा मिळणारच नाही. तांत्रिकदृष्ट्या,iphone SE सवलत १०,००० रुपयांखाली उपलब्ध बजेट स्मार्टफोन म्हणून पात्र आहे, यासाठी तुम्हाला फक्त डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची आवश्यकता आहे. २०२० मध्ये लाँच झालेला एक नवीन आयफोन एंट्री लेव्हल अँड्रॉइड स्मार्टफोन सारख्याच किमतीसाठी मिळू शकतो. SE कमीतकमी चार वर्षांचे OS अपडेट आणि उत्तम कामगिरी देतो. हे वेगळे सांगायची गरज नाही. तुम्ही फ्लिपकार्टवर iPhone SE स्वस्तात खरेदी करू शकता. पाहा डिटेल्स. वाचा: iPhone SE फ्लिपकार्टवर बजेट अँड्रॉइड फोनइतकाच स्वस्त: IPhone SE आता सर्वांसाठी २५,९९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. तसेच , ६४ GB व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आहे. जर तुम्ही ICICI बँक आणि Axis Bank क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केले. तर, तुम्ही १५०० रुपयांची सूट ,मिळवू शकता. यामुळे किंमत तब्बल २४,४९९ रुपयांपर्यंत खाली येते. सोबतच, Flipkart वर एक्सचेंज ऑफर देखील आहे. फ्लिपकार्टनुसार पात्र फोनवर १५,००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. जर iPhone XR एक्सचेंज ऑफरमध्ये असेल तर, फ्लिपकार्टमध्ये १५ हजार रुपयांची सूट देखील मिळू शकते. यानंतर फोनची किंमत ९,४९९ रुपये असेल. म्हणजेच, iPhone आतापर्यंतच्या बेस्ट ऑफरसह उपलब्ध होईल आणि तुम्ही तो अगदी बजेट फोनच्या किमतीत खरेदी करू शकाल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FeEUaa