Full Width(True/False)

सुपरस्टार रजनीकांत यांनी लाँच केला सोशल मीडिया अॅप, मराठी भाषेत बोलता येणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः यांनी आपला एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. हा एक व्हाइस आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याचे नाव Hoote आहे. Hoote अॅपला रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांतने फंडिंग केली आहे. Hoote सोबत ८ भाषेचा सपोर्ट आहे. ज्यात भारतीय आणि विदेशी अशा दोन्ही भाषेचा समावेश आहे. Hoote मध्ये भारतीय भाषेत मराठी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि गुजरातीचा सपोर्ट मिळतो. Hoote चे फीचर्स Hoote ला या पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे की, युजर्सं काहीही टाइप न करता फक्त बोलून मेसेज पाठवू शकतो. साध्या शब्दात सांगायचे म्हणजेच Hoote एक व्हाइस नोट अॅप आहे. एकदा व्हाइस नोट रेकॉर्ड केल्यानंतर युजर्स यात आपल्या आवडीनुसार, म्यूझिक आणि इमेज अॅड करू शकतो. Hoote अॅपला गुगल प्ले स्टोरवरून फ्री मध्य डाउनलोड करू शकता येते. अॅपचा वापर करण्याआधी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. अॅपमध्ये रजनीकांत, गौतम गंभीर, न्यूज चॅनेल, राजकीय नेते, सिलेब्रिटीला फॉलो करू शकाल. अॅपमध्ये सध्या व्हाइस नोटला सहज प्ले आणि पॉझ केले जावू शकते. यात लाइट, रि-पोस्ट, आणि रि-शेअर सारखे ऑप्शन मिळतील. Hoote अॅपचे युजर्स जास्तीत जास्त ६० सेकंदाचा व्हाइस नोट रिकॉर्ड करू शकतात. रिकॉर्डिंग नंतर कॅप्शन, बॅकग्राउंड म्यूझिक, आणि इमेज अॅड केले जावू शकतात. म्यूझिक साठी इमोशन, इनव्हायरलमेंट, नेचर, रिलिजनल आणि नेटिव्ह सारखे ऑप्शन मिळतील, Hoote अॅप मध्ये कमेंट बंद करण्याचाही ऑप्शन आहे. कॅप्शन साठी जास्तीत जास्त १२० शब्दाचा पर्याय मिळेल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Cuun93