दिवाळी अगदी काही दिवसांवर आहे. लोकांनी खरेदीची यादी बनवली असून काहींची खरेदीही सुरू झाली आहे. दिवाळीत प्रत्येकजण काहीतरी नवीन खरेदी करण्याचा विचार करतो, कारण बरेच लोक दिवाळीला नवीन खरेदीसाठी शुभ मुहूर्त देखील मानतात. ई-कॉमर्स वेबसाइट्स देखील या संधीचा फायदा घेतात. म्हणूनच जवळ-जवळ प्रत्येक ऑनलाइन साइट्स या प्रसंगी बंपर ऑफर देतात. दिवाळीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. जर तुम्ही या दिवाळीत स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप किफायतशीर ठरू शकते. Flipkart 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम सूट देत आहे. ज्यामुळे तुमच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही. हे टीव्ही केवळ तुमचा आधुनिक कनेक्टेड राहण्याचा अनुभव वाढवण्यासाठी काम करेल असे नाही तर, तुमच्या घराची सजावट आणखी सुंदर बनवेल. पाहा लिस्ट.

OnePlus Y Series 108 cm
OnePlus TV ४३ Y1 मध्ये ४३ इंचाचा फुल HD वाइड कलर डिस्प्ले आहे. त्याच्या डिस्प्लेला स्लिम बेझल-लेस डिझाइनमध्ये ८८.५ % स्क्रीन टू बॉडी रेशो देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये २ HDMI, WiFi २.४ GHz आणि Bluetooth ५.० कनेक्टिव्हिटीसह 2 USB पोर्ट आहेत. इतर भागांमध्ये RF, AV, इथरनेट, ऑडिओ आउट सुविधा देखील समाविष्ट आहे. टीव्हीमध्ये दोन स्पीकरसह एकूण २० W चे साउंड आउटपुट आहे. हे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करते. टीव्ही अँड्रॉइड टीव्ही ९.० वर गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट बिल्ट-इन सुविधांनी सुसज्ज आहे. टीव्ही २५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Kodak 43 UHD 7X PRO Android LED TV
हा LED टीव्ही ४३ -इंचाचा 4K UHD IPS डिस्प्लेसह येतो , जो चमकदार आणि उत्कृष्ट चित्र गुणवत्ता आणि कॉन्ट्रास्ट प्रदान करतो. यामध्ये तुम्हाला क्वाड-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. हे प्ले स्टोअरसह येते जे तुम्हाला तुमच्या आवडीचे अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी देते. कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन HDMI पोर्ट आणि एक USB पोर्ट आहे. इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव देण्यासाठी यात डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस व्हर्च्युअल एक्स सह २० W स्पीकर आहेत. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा टीव्ही २३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
TCL 4K LED TV 43P615
TCL ४३ इंच एलईडी टीव्हीमध्ये ६० Hz रिफ्रेश रेटसह 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. यात 4K अपस्केलिंग, डायनॅमिक कलर एन्हांसमेंट आणि मायक्रो डिमिंग वैशिष्ट्ये आहेत. Google Play Store द्वारे स्मार्ट टीव्हीच्या ५,००० हून अधिक अॅप्सचा प्रवेश दिला जाईल. तुम्हाला YouTube आणि Netflix सारखी सर्व लोकप्रिय अॅप्स देखील मिळतात. हे तुम्हाला २ GB रॅम आणि १६ GB इंटर्नल स्टोरेज देते. या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह २४ W स्पीकर आहेत. पोर्ट्सच्या बाबतीत, TCL ४३ इंच LED TV मध्ये ३ HDMI पोर्ट आणि १ USB पोर्ट आहे. तुम्ही TV ३०,००१ रुपयांना खरेदी करू शकता.
Mi TV 4X 43 inch
Mi TV 4X हा ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीच्या यादीत नक्कीच बजेट आणि चांगला पर्याय असू शकतो. यात ६० Hz रिफ्रेश रेटसह ४३ इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. यामध्ये किड्स मोड विथ पॅरेंट लॉक आणि इतर अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. Netflix, Prime Video आणि Disney + Hotstar सारखे लोकप्रिय OTT अॅप्स Mi TV ४ X मध्ये देखील ऑपरेट केले जाऊ शकतात. हा टीव्ही तुम्हाला Mi TV 4X वर ३ HDMI पोर्ट, २ USB पोर्ट आणि ३.५ mm हेडफोन जॅक देखील देतो. हा टीव्ही २७,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
Blaupunkt 43-inch Cybersound 4K Android TV
Blaupunkt हा एक अतिशय विश्वासार्ह ब्रँड आहे जो ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम सूट देत आहे. ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये ५० W स्पीकर आउटपुट आहे ज्यामध्ये बेझल-लेस डिझाइन देखील आहे. यात डॉल्बी एमएस12 साउंड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तुमच्या कानाला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. यात डॉल्बी डिजिटल प्लस पॉवर्ड साउंड तंत्रज्ञान आहे, जे तुमच्या कानाला इजा करत नाही. हे मॉडेल नवीन Android 10 द्वारे समर्थित आणि २ GB RAM आणि ८ GB ROM सह आहे. तुम्ही हा टीव्ही २८,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bn90F3