नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीझनला लवकरच सुरुवात होणार आहे. वर्षातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल Amazon-Flipkart वर आयोजित केला जाणार आहे. ने सेलचे आयोजन केले आहे. तर ने सेलचे नाव दिले आहे. वाचा: तुम्ही देखील या सेलची नक्कीच वाट पाहत असाल व खरेदी करण्यासाठी वस्तूंची यादी देखील तयार केली असेल. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्हाला शॉपिंग करताना मदत होईल. 1. या सेलमध्ये ८० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काउंटचा दावा केला जातो. या ऑफर्समुळे आपण आकर्षित होऊन कोणताही विचार न करता खरेदी करण्याचा निर्णय घेतो. मात्र त्याआधी प्रोडक्ट्सच्या योग्य किंमतीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. प्रोडक्ट्सची किंमत व ऑफर्स योग्य आहेत का ते नक्की पाहा. ऑफर्सच्या नावाखाली फसवणूक होऊ देऊ नये. 2. फेस्टिव्ह सीझनमध्ये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जातो. मात्र, हा केवळ एक मार्केटिंग फंडा आहे. या ऑफरसाठी कंपनी आणि बँकेची भागीदारी असते. यात आधीच प्रोडक्ट्सची किंमत जास्त दाखवली जाते व बँकांना व्याज दिले जाते. त्यामुळे प्रोडक्ट्सची किंमत खूपच जास्त तर नाही हे पाहा. 3. ऑनलाइन शॉपिंगमध्ये रिटेलर्स कॅशबॅकच्या नावाखाली आकर्षित करतात. यामुळे कंपन्यांच्या प्रोडक्ट्सची विक्री वाढण्यास मदत होते. यामुळे यूजर बजेटच्या बाहेर जाऊन प्रोडक्ट्स खरेदी करतात व त्यानंतर कॅशबॅक दिला जातो. त्यामुळे अशा ऑफर्सपासून सावध राहायला हवे. 4. प्रोडक्ट्सबाबत देखील अनेक बनावट रिव्ह्यू लिहिले जातात. प्रोडक्ट खरेदी करताना रिव्ह्यू योग्य आहेत की नाही हे देखील तपासा. याशिवाय गॅरेंटी-वॉरंटीवर देखील विशेष लक्ष द्या. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AUCiLT