Full Width(True/False)

WhatsApp ने सगळे टेन्शनच संपविले, एका क्लिकवर करता येणार पेमेंट, पाहा पेमेंटमधील 'हे' नवीन अपडेट

नवी दिल्ली: केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातच वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कंपनीच्या नव- नवीन अपडेट्स मुळे हे App युजर्सच्या पसंतीचे बनले आहे. गेल्या काही महिन्यांत, लोकप्रिय मेसेजिंग अॅप, WhatsApp ने अनेक नवीन अपडेट्स जारी केले असून ते युजर्सना देखील आवडत आहेत. त्यापैकी एक Feature देखील आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही मित्र आणि नातेवाईकांना सहज पैसे पाठवू शकाल. व्हॉट्सअॅपचे हे पेमेंट वैशिष्ट्य युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर काम करते. जेणेकरून तुम्ही थेट मोबाइल अॅपवरून पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकाल. पाहा यात काय बदल झालाय. वाचा: WhatsApp चॅटबॉक्समध्ये असणार '₹' चिन्ह : अलीकडेच WhatsApp बनवणाऱ्या Facebook ने आपल्या भारतीय युजर्साठी एक विशेष अपडेट जारी केले आहे. हा बदल व्हॉट्सअॅप पेमेंट्स फीचरशी संबंधित आहे. कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) 2021 मध्ये जाहीर केले आहे की, आतापासून सर्व व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या चॅट बॉक्समध्ये '₹' रुपयाचे चिन्ह जारी केले जाईल, ज्यामुळे व्हॉट्सअॅप पेमेंट फीचर वापरणे सोपे होईल. यासह, फेसबुकने अशी माहिती देखील जारी केली आहे की, व्हॉट्सअॅपच्या चॅट बॉक्समधील कॅमेरा आयकॉन युजर्सना भारतातील २० दशलक्षाहून अधिक स्टोअरमध्ये कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून हे वैशिष्ट्य वापरण्याची परवानगी देईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने व्हॉट्सअॅपचे फेज वाइज पेमेंट्स फीचर जारी केले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3io1Qd5