Full Width(True/False)

'शेरशाह' अडचणीत! काश्मिरी पत्रकाराने केली कायदेशीर कारवाई

मुंबई : अभिनेता आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाला लोकांनी पसंती दिली. यात कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शाैर्य गाथा पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रु आले. ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी हा चित्रपट आता अडचणीत सापडला आहे. झाले असे की, फराज अश्रफ नावाच्या एका काश्मिरी पत्रकाराने म्हटले आहे की, त्याचे आयुष्य संकटात आहे, कारण 'शेरशाह' चित्रपट निर्मात्यांनी त्याच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर चित्रपटात करत त्याची कार दहशतवाद्यांची असल्याचे दाखवले आहे. फराज यांनी शेअर केले काही फोटो फराज यांनी त्यांची कार व चित्रपटात दर्शवण्यात आलेल्या कारचे फोटो शेअर केले आहेत. दोन्ही कारची नंबर प्लेट एकसारखीच आहे. पत्रकाराने दावा केला आहे की, या कारणामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. पत्रकाराच्या कुटुंबाला दिली जातेय धमकी काश्मिरी पत्रकार फराज याने ट्विटरवर लिहिले की, 'मला व माझ्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. मी कारमधून प्रवास करु शकत नाही, कारण त्यामुळे सुरक्षित वाटत नाही. मी कोणत्याही चित्रपट निर्माता कंपनीला माझ्या कारचा नोंदणीकृत नंबर वापरण्याची परवानगी दिलेली नाही. आता मी ठरवले आहे की, मी धर्मा मुव्ही विरोधात लढणार आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात चित्रपटाचे प्रदर्शन थांबेल.' फराज प्रॉडक्शन कंपनीविरोधात याचिका करणार काश्मिरी पत्रकार फराजने पुढे लिहिले की,'चित्रपट तयार करणाऱ्यांनी माझ्या नोंदणीकृत नंबर कॉपी केला व चित्रपटात त्याचा वापर केला. मी निर्माता कंपनीविरोधात याचिका दाखल करत आहे. 'शेरशाह' या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले आहे. चित्रपटात कियारा आडवाणीने विक्रम बत्राची प्रेयसी डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a0b5vg