मुंबई- नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री मुंबईहुन गोव्याला जात असलेल्या एका आलिशान क्रूजवर छापेमारी केली. या क्रूजवर एक मोठी ड्रग पार्टी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी ही कारवाई केली. परंतु, या पार्टीमध्ये लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता याचा मुलगा देखील असल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आर्यन सध्या एनसीबीच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. आर्यनने दिली पाहुणा म्हणून पार्टीला गेल्याची कबुली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनला पार्टीमध्ये एक सेलिब्रिटी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी आर्यनकडून कोणत्याही प्रकारची फी घेण्यात आली नव्हती. आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीकडून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आर्यनकडे काहीप्रमाणात अंमली पदार्थ देखील आढळले आहेत. माहितीनुसार, हे अंमली पदार्थ आर्यनच्या डोळ्यांच्या लेन्सच्या डब्बीमध्ये लपवण्यात आले होते. परंतु, एनसीबी अधिकाऱ्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. पार्टीसाठी इतरांनी भरले लाखो रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूजवर येण्यासाठी लोकांनी ६० हजारापासून ते पाच लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे. या पार्टीत तब्बल ६०० लोक उपस्थित होते. या सगळ्या जणांना इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आमंत्रण देण्यात आलं होतं. पार्टीमध्ये सहभागी असलेल्या लोकांपैकी अधिकाधिक लोक दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यातही हे लोक दिल्लीतील प्रतिष्ठित घरांशी संबंधित आहेत. ही क्रूजपार्टी एका विदेशी कंपनी आणि एन्टरटेनमेन्ट चॅनेलने मिळून आयोजित केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ot6NFf