नवी दिल्ली : जुन्या कार्स-बाइक्ससह गेल्या काही दिवसात जुने फोन्स अर्थात सेकेंड हँड स्मार्टफोन्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कमी पैशात लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्टफोन्स खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र, जुने खरेदी करण्याआधी काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. वाचा: सेकेंड हँड फोन खरेदी करण्याआधी तो पूर्णपणे तपासणे गरजेचे आहे. त्याचे कोपरे पाहावेत. कारण, यावर डेंट्स आणि स्क्रॅचेस असू शकते. तसेच, अॅप्स लोड होण्यास व बंद होण्यास जास्त वेळ तर लागत नाही ना हे पाहावे. फोन स्क्रीन ऑन-ऑफ करून पाहावी. यामुळे बटन्स व्यवस्थित चालतात की नाही याची माहिती मिळते. तसेच, एखादे गाणे अथवा ऑडिओ प्ले करून स्पीकर तपासावा. याशिवाय चार्जर व यूएसबीसाठीचे पोर्ट व्यवस्थित आहे का ते पाहावे. जुना फोन घेताना बिल नक्की घ्यावे व पाहावा. हा नंबर तुम्हाला फोनची सेटिंग्स, फोनचा बॉक्स, फोनच्या बॉडीवरील स्टिकर आणि बॅटरीवर देखील मिळेल. जर बॅटरी रिमूव्हेबल असेल व त्यावरील नंबर दुसरा असल्यास समजून जा की, बॅटरी बदलली आहे. याशिवाय तुम्ही *#06# डायल करून देखील हा नंबर काढू शकता. सेकेंड हँड बाजारात अनेकदा चोरी केलेल्या फोन्सची विक्री होती. त्यामुळे असे फोन्स खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, तो फोन आधी कोणाकडे होता व त्याचा कोणत्या कामासाठी वापर झाला आहे, याची तुम्हाला माहिती नसते. सेकेंड हँड फोन खरेदी करताना समोरील व्यक्ती बिल देत असेल तरच तो फोन खरेदी करा. बिलच्या कॉपीवर खरेदीदाराचे नाव व तारीख असणे गरजेचे आहे. याशिवाय, फोनसोबतच चार्जर आणि त्याचा बॉक्स देखील नक्की मागा. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3isUW6c