नवी दिल्लीः Diwali Mi Sale सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक ऑफर्स दिले जात आहेत. स्मार्ट टीव्ही पासून स्मार्टफोन पर्यंत अनेक प्रोडक्ट्स कमी किमतीत उपलब्ध केले जात आहेत. टीव्ही सेगमेंट मध्ये तुम्हाला कमी किंमतीत जबरदस्त टीव्ही खरेदी करता येवू शकते. प्रत्येकाला स्वस्त किंमतीत टीव्ही खरेदी करायचा असतो. परंतु, चांगले ऑफर्स न मिळाल्याने ती संधी मिळत नाही. जर तुम्हाला स्वस्त किंमतीत टीव्ही खरेदी करायचा असेल तर Diwali Mi Sale मध्ये 80cm (32) Horizon Edition टीव्ही खूपच कमी किंमतीत मिळू शकतो. Mi TV 4A 80cm (32) Horizon Edition ची किंमत आणि ऑफर्स ३२ इंचाचा स्मार्ट टीव्हीला १९ हजार ९९९ रुपयाच्या किंमती ऐवजी १५ हजार ४९९ रुपयाच्या किंमतीत उपलब्ध केले जात आहे. यासोबतच एसबीआय क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट उपलब्ध केले जात आहे. हा डिस्काउंट जास्तीत जास्त १२५० रुपयांपर्यंत आहे. याला नो कॉस्ट ईएमआय वर सुद्धा खरेदी करू शकता. रिवॉर्ड मी कूपन अंतर्गत १५० रुपयाचा डिस्काउंट सुद्धा दिला जात आहे. MobiKwik द्वारे पेमें केल्यानंतर आणि MBKFEST400 कूपन कोड केल्यानंतर युजर्संना ४०० रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट दिला जाणार आहे. Mi TV 4A 80cm (32) Horizon Edition चे फीचर्स यात ३२ इंचाचा कॅपेटिव्ह हॉरिजन डिस्प्ले दिला आहे. हे विविड इंजिन आणि पॅचवॉल एक्सपीरियन्स सोबत येते. यात बेजल लेस डिझाइन दिले आहे. याचा रिझॉल्यूशन 1366 x 768 आहे. सोबत रिफ्रेश रेट 60Hz आहे. यात १० वॉटचे २ ऑडियो पॉवर दिले आहे. सोबत मल्टी पोर्ट्स सुद्धा दिले आहे. ज्यात 3 USB:2.0, 1 इथरनेट, 1 AV, 1 ईयरफोन आदीचा समावेश आहे. यात क्वॉड कोर प्रोसेसर दिले आहे. हे १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज सोबत येते. यात Amlogic Cortex A53 क्वाड-कोर सीपीयू दिले आहे. सोबत पॅचवॉल सोबत अँड्रॉयड ओएस उपलब्ध केले आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WDBeND