Full Width(True/False)

Amazon-Flipkart सेलला सुरुवात, १५ हजारांपेक्षा कमी किमतीत मिळताहेत हे जबरदस्त स्मार्टफोन्स

नवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर ३ ऑक्टोबर पासून सेल सुरू झाली आहे. Amazon ने Great Indian Festival सेलची सुरुवात केली आहे. Flipkart वर Big Billion Days सेल सुरू झाली आहे. या दोन्ही सेलमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत खूप साऱ्या प्रोडक्ट्सवर सूट वर खरेदी करू शकता. डिस्काउंट शिवाय, अमेझॉन HDFC बँक कार्ड आणि फ्लिपकार्ट Axis व ICICI बँक कार्ड धारकांना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट ऑफर करीत आहे. आज आम्ही तुम्ही या ठिकाणी या दोन्ही सेलमध्ये सूट नंतर १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात जबरदस्त स्मार्टफोन्स संबंधी. Samsung Galaxy M32 या फोनला अमेझॉनवरून खरेदी करू शकता. फोनच्या ४ जीबी व्हेरियंटची किंमत ४५०० रुपयाच्या सूटनंतर १२ हजार ४९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 64MP+8MP+2MP+2MP चा क्वाड रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. Realme Narzo 30 5G फ्लिपकार्ट या फोनवर १ हजार रुपयांची सूट देत आहे. सूटनंतर या फोनच्या ४ जीबी व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी नार्जो ३० ५जी मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस, 48MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा, 16MP चा फ्रंट कॅमेरा आणि पॉवरसाठी 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसर दिला आहे. Redmi Note 10T 5G या फोनला अमेझॉनवरून खरेदी करता येवू शकते. या फोनच्या ४ जीबी व्हेरियंटची किंमत २ हजार रुपयांच्या सूट नंतर १४ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 48 MP + 2 MP + 2 MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. POCO M3 Pro 5G फ्लिपकार्ट या फोनवर १५०० रुपयाच्या सूट नंतर ४ जीबी व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा Full HD+ डिस्प्ले, 48MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा, 8MP चा फ्रंट कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी दिली आहे. OPPO A15s या फोनला अमेझॉनवरून खरेदी करू शकता. फोनच्या ४ जीबी व्हेरियंटची किंमत १ हजार रुपयाच्या सूटनंतर १२ हजार ९९० रुपये आहे. फोनमध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 13 MP + 2 MP + 2 MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4230mAh ची बॅटरी दिली आहे. MediaTek Helio P35 प्रोसेसर मिळतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l6ZHo0