मुंबई : मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापेमारी करुन अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य सात जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात एकूण 19 जणांना अटक झाली होती. आता याच प्रकरणातून एनसीबीने चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरासह कार्यालयावर काल (शनिवारी) छापेमारी केली होती. आता एनसीबीतर्फे पुन्हा एकदा इम्तियाज खत्रीला चाैकशीसाठी समन्स पाठवले आहे. एनसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, "आम्ही आज देखील इम्तियाज खत्रीला चाैकशीसाठी बोलावले आहे आणि यासोबतच आम्हाला आर्यनच्या कारचालकाकडून काही माहिती उपलब्ध झाली आहे." यापूर्वी इम्तियाज खत्रीचे नाव अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातही समोर आले होते. अचितकुमारने चाैकशीदरम्यान इम्तियाज खत्रीचे नाव घेतले होते. एनसीबीने दावा केलाय की, अचित कुमार हाच कथितरित्या आर्यन व अरबाज यांना अमली पदार्थ पुरवत होता. आर्यन व अरबाज यांनी एनसीबीच्या चाैकशीमध्ये अचित कुमारसोबतच श्रेयस नायर याचे नाव देखील घेतले होते. सूत्रांनी हे देखील सांगितले आहे की, या प्रकरणात प्रचंड दबाव असतानाही एजंसीकडून वेगाने तपास सुरू आहे आणि प्रत्येक दिवशी नवीन लोकांचा तपासाच्या घेऱ्यात समावेश होत आहे. असे सांगितले जाते की, आर्यन खानच्या कारचालकाच्या चाैकशीनंतर एनसीबीचे काल (शनिवारी) रात्री तब्बल सहा तास ऑपरेशन सुरू होते. काल संध्याकाळी शाहरुखच्या ड्रायव्हरची देखील चाैकशी झाली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oLxXYf