Full Width(True/False)

आर्यनला जामिन मिळणार! शाहरुखच्या मदतीसाठी धावले तेच वकील

मुंबई : बॉलिवूड स्टार चा मुलगा ला क्रूझवरील रेव्ह पार्टीत शनिवारी एनसीबीकडून अटक करण्यात आली. रविवारी दिवसभर त्याची चौकशीही झाली. या प्रकरणात अटक झालेल्या उर्वरित व्यक्तींची देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशी केली. दरम्यान शाहरुख खान याने मुलगा आर्यनच्या जामिनासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आर्यनच्या जामिनासाठी वकील कोर्टात बाजू मांडणार आहे. आणखी पाच जण अटकेत क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात काल मध्यरात्री आणखी पाच लोकांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या पाचजणांमध्ये नुपूर सतीजा, इश्मीत चड्ढा, मोहक जायस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत चोकर यांचा समावेश आहे. या पाच जणांना आज कोर्टात सादर केले जाणार आहे. एनडीजीएसच्या कलम २७ अंतर्गत झाली आर्यनला अटक नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबईत शनिवारी क्रूझमधील रेव्ह पार्टीवर केलेल्या छापेमारीत आर्यन खानसोबतच इतर व्यक्तींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर चाैकशीनंतर काल आर्यनसह तिघांना अटक करण्यात आली. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला अमली पदार्थांचे सेवन केल्या प्रकरणी एनडीपीएसच्या कलम २७ अंतर्गत अटक करण्यात आली. एनसीबी नाही करणार आर्यनच्या वाढीव कोठडीची मागणी माध्यमांतील वृत्तानुसार, एनसीबीकडून आता आर्यन खानच्या वाढीव कोठडीची मागणी करण्यात येणार नाही. मुंबई येथून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझमध्ये अमली पदार्थांसमवेत पकडल्या गेलेल्या आर्यनला एनसीबीने काल (रविवारी) न्यायालयात सादर केले. जिथे त्याला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सोमवारी आर्यनला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल, त्यानंतर लगेच त्याचे वकील जामिनासाठी अर्ज दाखल करतील. एनसीबी कार्यालयातील सेलमध्ये घालवली रात्र रविवारी कोर्टात साधारण १ तास चाललेल्या सुनावणीत आर्यन खान, अरबाज मर्चंट व मुनमुन धामेचा यांच्या वकीलांनी तसेच दुसरीकडे एनसीबीने देखील आपापली बाजू मांडली. त्यानंतर कोर्टाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तिघेही काल रात्री एनसीबी कार्यालयातील सेलमध्ये होते. आर्यन खानला आज जामिन मिळणार! मुंबईत एका क्रूझमधील रेव्ह पार्टीत अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला आज जामिन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आर्यन खानसोबतच अटक झालेले अरबाज मर्चंट व मुनमुन धामेचा यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तिघांना आज म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. आज आर्यनची कोठडी संपणार आहे, त्यानंतर त्याचे वकील जामिनासाठी अर्च दाखल करतील. त्यानंतर त्यावर सुनावणी होईल. या प्रकरणात कोर्टात आर्यन खानची बाजू वकील सतीष मानेशिंदे मांडत आहेत. या अगोदर त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीदेखील बाजू मांडली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l991ra