Full Width(True/False)

BSNL चा धमाकेदार प्लान, रोज मिळेल ५ जीबी डेटा आणि इतक्या महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः Reliance Jio कमी किंमतीत जास्त डेटा साठी ओळखले जाते. वोडाफोन आयडिया आणि एअरटेलकडे रोज जास्त डेटा मिळणार्या प्लान्सचा समावेश आहे. परंतु, कडे असा एक प्लान आहे. जो सर्वात पुढे आहे. रोज ५ जीबी डेटा देतो. बीएसएनएलचा हा प्लान ५९९ रुपयाचा आहे. या प्लानमध्ये कोणकोणते बेनिफिट्स मिळतात, जाणून घ्या. BSNL चा ५९९ रुपयाचा प्लान BSNL चा ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसांपर्यंत रोज ५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS मिळते. यासोबतच रात्री १२ वाजेपासून सकाळी ५ वाजेपर्यंत अनलिमिटेड फ्री डेटा दिला जातो. प्लानमध्ये फ्री कॉलरट्यून आणि Zing अॅपचे सब्सक्रिप्शन मिळतो. Vodafone-Idea चा ५९९ रुपयाचा प्लान Vodafone-Idea चा ५९९ रुपयाच्या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, विकेंड डेटा रोलओव्हर, फ्री नाइट डेटा आणि Vi Movies & TV चे फ्री अॅक्सेस मिळते. जिओचा ५९९ रुपयाचा प्लान जिओचा ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते. या पॅकमध्ये २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. यात जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Bbl6BT