Full Width(True/False)

मस्तच! सोन्यापेक्षा महाग आहे घरातील जुना स्मार्टफोन, खरेदी करू शकता ‘एवढे’ टन सोने

नवी दिल्ली : तुमच्या घरात पडून असलेल्या जुन्या स्मार्टफोनची किंमत सोन्यापेक्षा अधिक आहे, हे तुम्हाला माहितीये का? मोबाइल फोनच्या बदल्यात किती टन मिळू शकते माहितीये? तुम्ही एक टन जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात एक टनापेक्षा अधिक सोने खरेदी करू शकता. तज्ञांनुसार, एक टन जुन्या फोन्सची किंमत एक टन कच्च्या सोन्यापेक्षा जास्त असते. वाचाः च्या निमित्ताने तज्ञांनी सांगितले की, जगभरात फोन्स व अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सद्वारे ई-कचरा निर्माण होत आहे. मात्र, याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नाहीये. रिपोर्टनुसार, यासाठी व्यापारी आणि सरकारने पुढे यायला हवे. कारण, ई-कचऱ्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याची संधी आहे. खराब व बेकार प्लग इन अथवा बॅटरी ऑपरेटेड प्रोडक्ट्सला पुन्हा वापरू शकता. यामुळे नवीन वस्तूंची गरज कमी पडेल. रिपोर्टनुसार, एक मिलियन सेल फोनला रिसायकल केल्यास, त्याद्वारे २४ किलो सोने, १६ हजार किलो कॉपर, २५० किलो चांदी आणि १४ किलो पॅलेडियम मिळेल. मात्र, ८२.६ टक्के मोबाइल फोन्स व इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सला बेकार असल्याचे म्हणत फेकून दिले जाते. गेल्या वर्षीच्या ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर रिपोर्टनुसार, वर्ष २०१९ मध्ये ५३.६ मिलियन मेट्रिक टन WEEE निर्माण झाले. जे मागील ५ वर्षातील सर्वाधिक आहे. याची एकूण किंमत ४१३,२७७ कोटी रुपये होती, जी अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. ई-कचऱ्यात वाढ यावर्षी इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा कचरा ५७.४ मिलियन टन असू शकतो. याचे वजन चीनच्या ग्रेट वॉलपेक्षा अधिक आहे. हे पृथ्वीवरील सर्वाधिक वजनदार आर्टिफिशियल ऑब्जेक्ट असेल. सरासरी प्रत्येक घरात ७२ इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सपैकी ११ खराब असतात. यूरोपमधील देशात एक व्यक्ती सरासरी ४ ते ५ किलो इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची निर्मिती करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iWsw4U