Full Width(True/False)

म्हाळसा फेम सुरभी हांडे येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, झळकणार 'या' मालिकेत

मुंबई- 'येळकोट येळकोट जय मल्हार' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'येळकोट येळकोट जय मल्हार' या मालिकेत सुरभीने खंडेरायांची पहिली पत्नी देवींची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. सुरभी घराघरात म्हाळसा म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचा साधाभोळा चेहरा प्रेक्षकांना भावला होता. म्हाळसा या भूमिकेने सुरभीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता सुरभी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. २३ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर 'अबोली' ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत सुरभी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मालिकेतील सुरभीची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असली तरीही प्रेक्षक तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सुरभीने काही काळ छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा सुरभी प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार आहे. सुरभी यापूर्वी '' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात सुरभीने तरुण सोनाली कुलकर्णीची भूमिका साकारली होती. सुरभीच्या त्या भूमिकेचं देखील प्रचंड कौतुक झालं होतं. आता सुरभी या मालिकेत कोणत्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. या मालिकेत सुरभी व्यतिरिक्त लोकप्रिय अभिनेता सचित पाटील देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सचितही या मालिकेतून अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Cw6TAf