Full Width(True/False)

मालिकेच्या सेटवर थोडक्यात बचावली मयुरी देशमुख, पाहा व्हिडीओ

मुंबई- 'खुलता कळी ही खुलेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी मालिकांमध्ये नाव कमावते आहे. '' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी मयुरी मराठीसोबतच हिंदी भाषिक प्रेक्षकांची प्रचंड लाडकी झाली आहे. हिंदी भाषिक प्रेक्षक मयूरीला भरभरून प्रेम देत आहेत. परंतु, मयुरी नुकतीच एका अपघातातून वाचली आहे. हा अपघात छोटा असला तरी यातून मयुरीला इजा झाली नाही हे पाहून मयुरीच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मयुरी सध्या 'इमली' या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याच मालिकेतील एक सीन चित्रित करताना हा अपघात झाला आहे. या सीनमध्ये मयुरी एक जळती फ्रेम हातात धरून त्याकडे एकटक पाहत असते. त्यानुसार मयुरी हातात जाड कागद घेऊन बसते आणि शेजारी असलेला व्यक्ती त्या कागदाला आग लावतो. ती आग विझते म्हणून तो पुन्हा त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकतो. मात्र असं करत असताना मयुरीच्या पायाजवळ असलेल्या एका कागदाला देखील आग पकडते. तो कागद पेटलाय हे मयुरीला जाणवतं आणि ती लागलीच मागे सरकते. तिच्या प्रसंगावधानतेमुळे पुढील अपघात टळतो. मात्र मयुरी जर वेळीच मागे सरकली नसती तर ती आग मयुरीच्या साडीला देखील लागू शकली असती. मयुरीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच व्हिडिओला 'प्यारसे डर नही लगता साहब आग से लगता हैं' असं कॅप्शनदेखील दिलं आहे. मयुरीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या मयूरीचं कार्यक्रमातील मालिनी हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w3C03S