मुंबई- आपल्या आरस्पानी सौंदर्याने आणि भेदक नजरेने सगळ्यांना घायाळ करणाऱ्या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. रेखा यांनी एकाहून एक हिट चित्रपटात काम केलं. अभिनेत्री म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. परंतु, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चाहत्यांमध्ये कायम चर्चा राहिली. जेव्हा जेव्हा रेखा यांचं नाव घेतलं जातं तेव्हा बॉलिवूडचे महानायक यांचं नाव ओघाने येतंच. रेखा आणि अमिताभ यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी होती. परंतु, एक वेळ अशी आली जेव्हा रेखा यांना पाहून अमिताभ एका पार्टीतून आल्या पावली घरी परत आले होते. अमिताभ आणि रेखा यांनी 'मुकद्दर का सिकंदर', 'सिलसिला', 'मिस्टर नटवरलाल', 'खून पसीना', 'दो अनजाने', 'आलाप', 'गंगा की सौगंध', 'सुहाग', 'राम बलराम' सारख्या हिट चित्रपटात काम केलं. चित्रपटात काम करताना त्यांच्यात जवळीक वाढू लागली. परंतु, त्याचा परिणाम अमिताभ यांच्या वैवाहिक जीवनावर होऊ लागला. त्यामुळे अमिताभ रेखा यांना टाळू लागले. एकदा अभिनेत्री शबाना आझमी यांनी अमिताभ आणि जया बच्चन यांना त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. अमिताभ आणि जया त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी ड्राइव्हरसोबत गाडी परत पाठवून दिली. परंतु, आत येताना अमिताभ यांना रेखा दिसल्या आणि अमिताभ आल्या पावली पार्टीतून निघून गेले. त्यांनी बाहेर येऊन टॅक्सी पकडली आणि ते घरी आले. रेखा यांनी बॉलिवूड अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केलं. परंतु, विनोद यांच्या आईला हे लग्न कधीही मान्य झालं नाही. त्यामुळे हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर रेखा यांनी बिजनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. परंतु, मुकेश यांनी लग्नाच्या सहा महिन्यांनंतर आत्महत्या केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DtRz7j