मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह यांचा ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. १९४२ मध्ये जन्मलेल्या अमिताभ येत्या वाढदिवसाला ७९ वर्षांचे होणार आहेत. या वयातही त्यांचा कामाचा जो उत्साह आहे तो विशीतील तरुणाला लाजवणारा असा आहे. 'भुवन शोम' या सिनेमात आवाजाच्या माध्यमातून मनोरंजन सृ्ष्टीमध्ये अमिताभ यांनी प्रवेश केला. त्यानंतर अभिनयाच्या प्रांतामध्ये यशाचे जे शिखर गाठले आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आज ते बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात. बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान केले निर्माण आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर अमिताभ बच्चन यांनी 'सात हिंदुस्थानी' या सिनेमाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आनंद, जंजीर, अभिमान, सौदागर, चुपके चुपके, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, त्रिशुल, डॉन, मुकद्दर का सिकंदर, मि. नटवरलाल, लावारिस, सिलसिला, कालिया,सत्ते पे सत्ता,नमक हलाल, शक्ति, कुली, शराबी, मर्द, शहंशाह, अग्निपथ, खुदा गवाह, मोहब्बतें, बागवान, ब्लँक, वक्त, सरकार, चीनी कम, भूतनाथ, पा, सत्याग्रह, चेहरे अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. अमिताभ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेमासृष्टीमध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. 'वन मॅन इंडस्ट्री' किताब अभिनय करत असताना अमिताभ यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. परंतु तिथले वातावरण त्यांना फारसे मानवले नाही आणि ते पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत झाले. अमिताभ यांनी १९७० ते १९८० हे दशक गाजवले होते. या काळात त्यांचे सर्वाधिक सिनेमे प्रदर्शित झाले आणि ते हिट ठरले होते. त्यामुळे त्यांना 'वन मॅन इंडस्ट्री' असे म्हटले जाऊ लागले होते. हा किताब अमिताभ यांना फ्रेंच डायरेक्टर फ्रांस्वा ट्रुफोटा यांनी दिला होता. पूर्वीचे अलाहाबाद म्हणजेच आजचे प्रयागराज येथील हिंदीमधील ख्यातनाम कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्या घरी अमिताभ यांचा जन्म झाला. आजही ७९ वर्षी अमिताभ तितक्याच उत्साहाने सक्रीय आहेत. आजही छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती १३' या कार्यक्रमाचे अमिताभ सूत्रसंचालन करत आहेत.असा हा लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याची एकूण संपत्ती किती आहे हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. अनेक पुरस्कारांनी सन्मानित गेल्या पाच दशकांपासून अमिताभ बच्चन यांनी विविध सिनेमांत काम करून हिंदी सिनेमासृष्टीतील ते 'शहंशाह' झाले आहेत. अमिताभ यांनी आतापर्यंत २०० हून अधिक सिनेमांत काम केले आहे. त्यांना आतापर्यंत अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात दादासाहेब फाळके पुरस्कारापासून ते पद्मश्री, पद्मभूषण हे सर्वोच्च सन्मानही मिळाले आहेत. इतकेच नाही तर त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर १६ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अमिताभ हे केवळ अभिनेता नाही तर पार्श्वगायक, सिनेमा निर्माते देखील आहेत. त्यांनी मोठ्या पडद्याबरोबच छोट्या पडद्यावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अमिताभ यांनी सिनेमाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये फ्रान्स सरकारने नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोट्यवधींचे मालक सिनेमांसोबत सोशल मीडियावरही सक्रीय असलेले अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. एका रिपोर्टनुसार अमिताभ यांची एकूण संपत्ती २,९५० कोटी इतकी आहे. अमिताभ यांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. तर महिन्याभराची त्यांची कमाई पाच कोटी रुपयांहून अधिक आहे. 'जंजीर' सिनेमामधून सिनेमाप्रेमींच्या मनामध्ये स्वतःचे स्थान अमिताभ यांनी निर्माण केले आहे. या सिनेमातील प्रत्येक संवाद प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.अमिताभ यांनी सिनेमा सृष्टीमध्ये चांगले दिवसही पाहिले आणि वाईट दिवसही पाहिले आहेत. २६ जुलै १९८२ मध्ये कुली सिनेमाच्या चित्रीकरणावेळी अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत त्यांच्या जीवावर बेतले होते. सुदैवाने ते यातून सहीसलामतपणे बाहेर पडले. आजही अमिताभ बच्चन तितक्यात उत्साहाने कार्यरत आहेत. अभिनय सम्राट असलेल्या अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यांच्याकडे ११ गाड्या आहेत. त्यामध्ये लेक्सस, रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे...
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DuBgqN