नवी दिल्ली : ने Play Store वरून तीन बनावट अॅप्सला हटवले आहे. यात मॅजिक फोटो लॅब-फोटो एडिटर, ब्लेंडर फोटो एडिटर – ईजी फोटो बॅकग्राउंड एडिटर आणि पिक्स फोटो मोशन एडिट २०२१ चा समावेश आहे. गुगलनुसार, हे यूजर्सची खासगी माहिती व पैसे चोरी करत होते. हे अॅप्स आता प्ले स्टोरवर उपलब्ध नसून, गुगलने यूजर्सला मोबाइलमधून देखील डिलीट करण्यास सांगितले आहे. वाचाः सिक्योरिटी एजेंसी Kaspersky नुसार, हे तिन्ही अॅप्स यूजर्सला फसवण्यासाठी व त्यांच्या बँक अकाउंटपर्यंत पोहचण्यासाठी फेसबुक लॉग इनचा वापर करत होते. Login with Facebook हा सामान्य पर्याय असून, अनेक अॅप्स आणि वेब पोर्टलवर यूजर्सला हा पर्याय मिळतो. अनेक यूजर्स लॉग इनसाठी हाच पर्याय निवडतात. Kaspersky नुसार, हे अॅप्स साइन-इन डेटाचा वापर करून क्रेडिट कार्ड व खासगी माहितीपर्यंत पोहचत असे. ज्या यूजर्सच्या फोनमध्ये आधीपासूनच ’, ‘’ आणि ‘' हे अॅप्स असतील त्यांनी त्वरित डिलीट करावे लागेल. तसेच, सुरक्षेसाठी फेसबुक लॉग इन पासवर्ड देखील बदलावा. यूजर्सला डेटा चोरी करण्याची शक्यता कमी असलेल्या व लोकप्रिय फोटो एडिटिंग अॅप्सचा वापर करायला हवा. तसेच, सुरक्षेसाठी अॅप्स डाउनलोड करताना काळजी घ्यायला हवी. अनेकदा अॅप्स खरे वाटतात, मात्र ते बनावट असतात व यूजर्सची खासगी माहिती चोरी होते. दरम्यान, गुगलने काही दिवसांपूर्वी प्ले स्टोरवरून १५० पेक्षा अधिक अँड्राइड अॅप्सला हटवले आहे. हे अॅप्स Gift Horse Trojan malware चा वापर करत होते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mTo0p0