Full Width(True/False)

मानसी नाईकच्या बेबी बंप मागचं सत्य आलं समोर, वाचा तिची पोस्ट

मुंबई: अभिनेत्री हिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला होता. मानसीचा हा फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कारण मानसीने बेबी बंप दाखवणारा तिचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर केल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचे चर्चा होऊ लागल्या आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला होता. परंतु मानसी हा फोटो एका शॉर्ट फिल्ममधील असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. प्रमोशन करण्यासाठी म्हणून मानसीने हा फोटो शेअर केला होता. मानसी आणि प्रदीप खरेरा यांचे १२ जानेवारी २०२१ मध्ये लग्न झाले. त्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांतच मानसीने बेबी बंप सोबत फोटो शेअर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. काही दिवस गेल्यानंतर आता मानसीनेच या फोटो मागचे खरे कारण इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे. या पोस्टसोबत तिने एक ग्रुप फोटो ही शेअर केला आहे. यात तिने लिहिले की, 'आम्ही सगळे लवकरच तुमच्या भेटीला येणार आहोत. सर्वातआधी माझा बेबी बंपमधील फोटो पाहून मनू आई होणार म्हणून तुम्ही सर्वांनी ज्या भरभरून शुभेच्छा दिल्या त्यासाठी मनापासून आभार मानते. मी सातत्याने नवीन कलाकरांसोबत काम करते आणि त्यांना पाठिंबा देते. सध्याच्या डिजीटल युगात तर खूपच तीव्र स्पर्धा आहे. काहीजण त्याकडे दुर्लक्ष करता, तर काहीजण त्याला पक्षपाती म्हणून नावे ठेवतात. याचा अनुभव मी देखील घेतला आहे. परंतु तुम्ही काम करताना जी मेहनत घेता, त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते यावर माझा विश्वासआहे. त्यामुळेच या नवीन टीमसोबत काम करण्याचे मी ठरवले. हे सर्वजण खूप छान आहेत. आम्ही सर्वांनी मिळून जो व्हिडिओ तयार केला आहे, तो सगळ्यांना आवडेल, अशी मला अपेक्षा आहे.' याच पोस्टमध्ये मानसीने पुढे म्हटले की, ' हा बेबी बंपमधील फोटो माझ्यासाठीही खूप खास आहे. आई होणे ही भावना खूप सुखद आणि अमुल्य आहे. तुम्हा सगळ्यांना मला या रूपात पाहण्याची इच्छा आहे. मी देखील वाट बघत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. त्यामुळे हे आता नाही. आई होण्याची जी प्रक्रिया असते त्यामुळे महिलेच्या मनातील भीती निघून जाते आणि ती अधिक कणखर होते. त्यामुळे आई होऊ इच्छिणाऱ्या सर्वजणींना खूप साऱ्या शुभेच्छा. मुलगा असो वा मुलगी आपल्या बाळासोबत क्षण घालवण्याचा आनंद काही औरच असतो.' दरम्यान, या शॉर्ट फिल्ममधील एक व्हिडिओ देखील मानसीने शेअर केला आहे. आता मानसीनेच या फोटोबद्दल खुलासा केला असल्याने तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mmjmPW