मुंबई- सुंदर दिसण्यासाठी कित्येक बॉलिवूड अभिनेत्री मेकअप करतात किंवा स्वतःच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून घेतात. परंतु, काही अभिनेत्री मुळातच इतक्या सुंदर असतात की चाहत्यांना त्यांच्या सौंदर्याची भुरळ पडते. अशा काही मोजक्या अभिनेत्रींनपैकी एक असणारी बॉलिवूडची लाडकी हिने एक पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आपल्या सौंदर्याने समोरच्याला घायाळ करणाऱ्या यामीने एक पोस्ट करत चाहत्यांना तिच्या त्वचेसंबंधीच्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. यामीला किराटोसिस पिलिरीस नावाचा आजार असल्याचा खुलासा यामीने केला आहे. यामीने पोस्ट करत लिहिलं, 'मी नुकतेच काही फोटो काढून घेतले. पण जेव्हा किराटोसिस पिलिरीस आजाराने ग्रस्त असलेली माझी त्वचा लपवण्यासाठी या फोटोंना पोस्ट प्रोडक्शनसाठी पाठवण्यात येणार होतं तेव्हा मी विचार केला, यामी तू सत्य का मान्य करत नाही? मला ही समस्या १२- १३ व्या वर्षी सुरू झाली आणि या आजारावर काहीही उपचार नाहीये. मी गेली अनेक वर्ष या समस्येचा सामना केला आहे. आता मला वाटणाऱ्या लाजेला बाजूला ठेवून स्वतःमध्ये असणाऱ्या कमतरतेला मान्य करत सगळ्यांना याबद्दल सांगण्याची हिम्मत केलीये. मला आता माझ्या चेहऱ्यामध्ये कोणताही बदल करण्याचं मन नव्हतं. तरीही मला खूप छान वाटत होतं.' यामीच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिची पाठ थोपटली आहे. स्वतःमधली कमी अशी सगळ्यांसमोर सांगायला खूप हिम्मत लागते असं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. यामी लवकरच 'ओह माय गॉड २' आणि 'लॉस्ट' चित्रपटांमध्ये दिसणार आहे. काय आहे किराटोसिस पिलिरीस किराटोसिस पिलिरीस या आजारामध्ये व्यक्तीच्या चेहऱ्यावर बारीक बारीक पुरळ किंवा दाणे येतात. त्वचा कोरडी होते. हा आजार त्वचेवरील केसांमध्ये केराटिन जास्त निर्माण झाल्याने होतं. जे त्वचेच्या छिद्रांना बंद करतं. त्यामुळे त्वचेच्या आणखी समस्या उद्भवू शकतात.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mvxnLk