मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते यांनी आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. संजय यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यांना विशेष करुन विनोदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी , वेलकम, धमाल, ऑल दी बेस्ट आणि फंस गए रे ओबामा सारख्या सुपरहीट विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच त्यांनी आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. आज जरी संजय एक प्रसिद्ध अभिनेते असले तरी, फार कमी लोकांना माहीत आहे की, एकदा संजय मिश्रा यांनी चित्रपट जगताला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय यांनी म्हटले होते की, एकेकाळी वैयक्तिक जीवनात ते खूपच त्रस्त होते. यामुळे त्यांनी आपले प्रोफेशन बदलण्याचाही विचार केला होता. संजय यांनी सांगितले की, ते खूप आजारी होते आणि त्याचवेळी त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यानंतर संजय मुंबई सोडून ऋषिकेशला गेले. ऋषिकेशमध्ये संजय एका ढाब्यावर ऑम्लेट बनवायचे आणि उष्टे कप धुवायचे. त्यासाठी त्यांना केवळ १५० रुपये मिळत होते. ढाब्यावर लोक त्यांना ओळखायचे, कारण त्यावेळी संजय यांनी 'गोलमाल' सारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम केले होते. त्यानंतर संजयला च्या 'ऑल दी बेस्ट' या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. १९६३ मध्ये जन्मलेल्या संजय मिश्रा यांनी बीएचयूमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून अभिनयात पदवीचे शिक्षण घेतले. १९९१ पासून अभिनय करत असलेल्या संजय मिश्रा यांनी 'ऑफिस ऑफिस' या टीव्ही मालिकेत शुक्लाची भूमिका साकारुन घराघरात आपली ओळख निर्माण केली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WMQkQO