मुंबई : '' कार्यक्रमाच्या येत्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या भागामध्ये बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल आणि सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. त्यामध्ये त्यांच्या अनुभवाचे बोल रितेशला सांगताना दिसत आहेत. काय म्हणाले अमिताभ बच्चन केबीसी १३ च्या आगामी भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. यात रितेश आणि जेनेलियाला कार्यक्रमाची तयारी कशी केली असा प्रश्न बिग बी विचारतात. जेनेलिया सांगते, 'आम्ही तुमचा कार्यक्रम कायम बघतो. त्यामुळे असे वाटते माझे जनरल नॉलेज चांगले आहे.' तर रितेशने सांगितले की, मी फार विशेष काही तयारी केलेली नाही. मी माझी लाईफलाईन, माझी बायकोच घेऊन आलो आहे. कारण तिची स्मरणशक्ती चांगली आहे. आज देखील जेनेलियाला आमच्या पहिल्या सिनेमाचे सगळे डिटेल्स माहिती आहेत. हा सिनेमा २० वर्षांपूर्वी रिलीज झाला होता.' त्यानंतर बिग बी रितेशला म्हणाले की, ' जेनेलियाची स्मरणशक्ती चांगली आहे. याचा जसा फायदा आहे तसाच तोटादेखील आहे. प्रत्येक नवऱ्याला वाटत असतं की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पत्नीला कळू नयेत.' अमिताभ यांनी सांगितलेली ही गोष्ट रितेशही मान्य करतो. अमिताभ नंतर सेटवरील सर्व पुरुषांना ही गोष्ट तुम्हाला देखील मान्य आहे का असे विचारतात. तर सर्वच हात उंचावून होकार देतात. याआधी कार्यक्रमाच्या पहिल्या प्रोमोमध्ये केबीसीच्या प्लॅटफॉर्मवर रितेश जेनेलियावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. रितेशने गुडघ्यावर बसून अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय डायलॉग म्हणताना दिसत आहे. ते ऐकून जेनेलिया लाजतेही. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात दर शुक्रवारी बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार सहभागी होतात. यावेळच्या भागामध्ये जेनेलिया आणि रितेश सहभागी होणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ahoaki