नवी दिल्ली: PDF फायलींमध्ये एक सामान्य समस्या अशी आहे की ती एडिट करता येत नाही . तसेच, कधीकधी कॉपी-पेस्ट करताना देखील समस्या येते. अशा परिस्थितीत लोकांना PDF फाइल टाईप करावी लागते. पण, ही समस्या टाळता येते. जर तुम्हाला PDF एडिट करायची असेल तर, काही सोप्या मार्गांनी वर्ड फाईलमध्ये रूपांतरित करून वापरले जाऊ शकते. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. वाचा: PDF ला वर्डमध्ये कसे रूपांतरित करावे?
- यासाठी सर्वप्रथम http://www.hipdf.com वेबसाइटवर क्लिक करा.
- येथे अनेक पर्याय उपलब्ध असतील. यातून तुम्हाला पीडीएफ टू वर्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर फाइल निवडा या पर्यायावर क्लिक करून पीडीएफ फाइल अपलोड करता येते.
- फाइल अपलोड केल्यानंतर, 'कन्व्हर्ट' बटणावर टॅप करा.
- अशा प्रकारे तुमची PDF फाईल वर्डमध्ये रूपांतरित होईल, जी डाउनलोड केली जाऊ शकते.
- यानंतर तुम्ही वर्ड फाइलमध्ये तुमच्यानुसार बदल करू शकाल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3B8USQB