नवी दिल्ली : भारतात स्मार्टफोन आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. हॅकर्स मॅलिशियस अॅपद्वारे नागरिकांची फसवणूक करत आहे. या मॅलिशियस अॅप आणि टूलला सर्च करणे अवघड आहे, कारण हे डिव्हाइसच्या खूप आत लपलेले असते. डिव्हाइसमध्ये व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर काही संकेत मिळत असतात. या आधारावर तुम्ही फोन हॅक झाला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. वाचा: मोबाइलची बॅटरी लवकर समाप्त होणे तुमच्या फोनची बॅटरी लवकर समाप्त असेल, तर डिव्हाइसमध्ये मॅलवेअर असण्याची शक्यता आहे. या मॅलवेअरमुळे फोनमधील अॅप जास्त बॅटरी वापरतात. अनेकदा फोनमधील बॅकग्राउंड अॅपमुळे देखील बॅटरी लवकर समाप्त होऊ शकते. त्यामुळे आधी बॅकग्राउंडमध्ये सुरू राहणारे अॅप बंद करून बॅटरीची स्थिती तपासा. अॅप क्रॅश होणे मोबाइल अॅप वारंवार क्रॅश होणे ही सामान्यबाब नाही. हॅक झाला असल्यास अॅप क्रॅश होतात. मात्र, त्याआधी तुम्ही अॅप अपडेट आहे की नाही हे देखील गुगल प्ले स्टोरवर जाऊन पाहायला हवे. अनेकदा अॅप अपडेट नसल्याने देखील क्रॅश होतात. पॉपअप आणि जाहिरात अनेकदा थर्ड पार्टी अॅप डाउनलोड केल्यानंतर स्मार्टफोनमध्ये पॉपअप-जाहिराती दिसू लागतात. त्यामुळे शक्यता आहे की फोनमध्ये मॅलवेअर असू शकतो. यापासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी अॅपचा वापर करणे टाळा. यामुळे तुमची खासगी माहिती देखील सुरक्षित राहील. स्मार्टफोन गरम होणे तुमचा फोन आपोआप गरम होत असेल तर डिव्हाइस हॅक झाल्याची शक्यता आहे. हॅकर्स तुमचा फोन ऑपरेट करत असल्याची शक्यता आहे. फ्लॅश लाइट सुरू होणे जर तुमच्या मोबाइलची फ्लॅश लाइट आपोआप सुरू होत असेल, तर डिव्हाइस हॅक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. हॅकर्स तुमचा डिव्हाइस वापरत असण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्यासाठी त्वरित फॅक्ट्री रीसेट करा, जेणेकरून फोनमधील मॅलवेअर डिलीट होईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vqqNtI