Full Width(True/False)

केवळ तीन रुपयांसाठी २४ तास काम करायचे नट्टू काका, घरभाडं भरण्यासाठी मागायचे उधार

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका '' मधील लोकप्रिय पात्र नट्टू काका म्हणजेच यांचं ३ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झालं. घनश्याम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. घनश्याम यांनी ५० वर्षांहून जास्त काळ मनोरंजन क्षेत्राला वाहून घेतलं. सुरुवातीच्या काळात तर केवळ तीन रुपयांसाठी घनश्याम यांनी २४ तास काम केलं. घनश्याम यांचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास मुळीच सोपा नव्हता. परंतु, 'तारक मेहता..' मधील नट्टू काका या पात्राने घनश्याम यांना लोकप्रियता मिळवून दिली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत घनश्याम यांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. घनश्याम म्हणाले, 'आता मी सगळ्यांना नट्टू काका म्हणून आवडतो. पण एक वेळ अशी होती जेव्हा मी ३ रुपये कमावण्यासाठी २४ तास काम केलं आहे. त्यावेळेस आपल्या इण्डस्ट्रीकडे एवढे पैसे नसायचे. कधीकधी तर आम्हाला आमचं मानधनही मिळत नव्हतं. त्यावेळेस मी घराचं भाडं देण्यासाठी आणि मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी शेजाऱ्यांकडे उधार मागायचो. ती वेळ खूप कठीण होती.' त्यानंतर घनश्याम म्हणाले, 'मला वाटतं की, 'तारक मेहता...' केल्यानंतर माझ्या आयुष्यात एका प्रकारचा शांतपणा आला आहे. त्यानंतर कामासाठी मला फार पळापळ करावी लागली नाही. या मालिकेनंतर मी मागे वळून पाहिलं नाही. आज माझ्याकडे मुंबईत दोन घरं आहेत.' नट्टू काका 'तारक मेहता...' च्या पूर्वी 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात झळकले होते. गेले काही वर्ष घनश्याम यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. एकदा शस्त्रक्रिया करून घनश्याम यांच्या घश्यातुन आठ गाठी काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्वर यंत्रावर परिणाम झाल्याने घनश्याम घरी आराम करत होते. परंतु, अखेर कर्करोगापुढे घनश्याम यांची जगण्याची इच्छाशक्ती कमी पडली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DdBxhT