मुंबई- आर्यन खान ड्रग प्रकरणात महत्वपूर्ण कामगिरी करणारे एनसीबीचे अधिकारी यांची पत्नी आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री हिच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. समीर यांच्यावर निरनिराळे आरोप होत आहेत. या संपूर्ण मानसिक त्रासाला क्रांती अतिशय धीराने सामोरी जात आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात मराठी चित्रपटसृष्टीतील एकही कलाकार क्रांतीच्या बाजूने बोलण्यास तयार नसल्याचं चित्र आहे. मराठी कलाकारांपैकी कुणीही क्रांतीला जाहीरपणे पाठिंबा दर्शवला नसल्याने या गोष्टीचं वाईट असल्याचं ट्विट लोकप्रिय अभिनेता याने केलं आहे. क्रांतीने तिला मिळणाऱ्या धमक्या आणि समीर यांच्यावर केले जाणारे आरोप याबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिचं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. क्रांती म्हणाली, 'मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला महाराष्ट्रातून, देशभरातून पाठिंब्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण मला आणि माझ्या कुटुंबाला माझ्याच राज्यात कुणीतरी त्रास देतंय हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना?' अशी प्रतिक्रिया क्रांतीने व्यक्त केली. यावर आरोहने ट्विट करत तिला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सोबतच इतर कलाकारांबद्दल वाईट वाटत असल्याचं देखील म्हटलं आहे. आरोहने ट्विट करत लिहिलं, 'क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इण्डस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहीत आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.' यासोबतच मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिनेदेखील क्रांतीची बाजू घेत समीर वानखेडे यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. आता सोनालीपाठोपाठ बिग बॉस विजेती मेघा धाडे हिनेदेखील क्रांतीला पाठिंबा दिला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zqmd2w