Full Width(True/False)

सॅमसंगने आणले तीन जबरदस्त लॅपटॉप, टचस्क्रीन अमोलेड डिस्प्ले खास फीचर्स

नवी दिल्लीः Samsung ने आपल्या लॅपटॉपची रेंज वाढवताना Galaxy Book Series च्या अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप Galaxy Book, आणि ला लाँच केले आहे. कंपनीच्या नवीन लॅपटॉप मध्ये 11-th Generation इंटेल कोर प्रोसेसर, ग्राफिक्स देण्यात आले आहे. नवीन लॅपटॉप अमेरिकेत लाँच करण्यात आले आहेत. गॅलेक्सी बुकची सुरुवातीची किंमत ७४९.९९ डॉलर म्हणजेच जवळपास ५६ हजार ३०० रुपये आहे. याला सेल साठी उपलब्ध करण्यात आले आहे. तर गॅलेक्सी बुक प्रो 360 5G आणि गॅलेक्सी बुक ओडिस्सी ची सुरुवातीची किंमत १३९९ डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ५ हजार १०० रुपये आहे. या दोन्ही लॅपटॉपला कंपनी ११ नोव्हेंबर पासून उपलब्ध करणार आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन गॅलेक्सी बुक १५.६ इंच आणि गॅलेक्सी बुक प्रो ३६० 5G १३.३ इंचाचा फुल एचडी अमोलेड टचस्क्रीन सोबत येते. गॅलेक्सी बुक ओडिस्सी मध्ये कंपनी १५.६ इंचाचा फुल एचडी एलईडी डिस्प्ले ऑफर करीत आहे. परंतु, यात टच सपोर्ट दिला नाही. कंपनीच्या नवीन लॅपटॉप अॅल्यूमिनियम चेसिस, ७२० पिक्सलचे एचडी वेबकॅम, ड्युअल ऐरे मायक्रोफोन आणि डॉल्बी ऐटमॉस सपोर्टचे स्टिरियो स्पीकर्स सोबत येते. सर्व लॅपटॉप मध्ये 11th जनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसर दिले आहे. या लॅपटॉपमध्ये ३२ जीबी पर्यंत रॅम सोबत १ टीबीपर्यंत स्टोरेज दिले आहे. गॅलेक्सी बुक आणि गॅलेक्सी बुक प्रो ३६० 5G मध्ये कंपनी अनुक्रमे इंटेल Iris Xe MAX आणि Iris Xe ग्राफिक्स ऑफर करीत आहे. गॅलेक्सी बुक ओडिस्सी मध्ये डेडिकेटेड NVIDIA GeForce RTX 3050Ti Max-Q ग्राफिक्स कार्ड दिले आहे. गॅलेक्सी बुक मध्ये 54Wh, गॅलेक्सी बुक प्रो 360 5G मध्ये 63Wh आणि गॅलेक्सी बुक ओडिस्सी मध्ये 83Wh ची बॅटरी दिली आहे. विंडोज 11 होम ओएस वर काम करणार्या या लॅपटॉप मध्ये कनेक्टिविटीसाठी वाय फाय ६, एक हेडफोन मायक्रोफोन कॉम्बो जॅक, एक मायक्रो एसडी कार्ड रीडर, यूएसबी पोर्ट आणि एक थंडरबोल्ट ४ स्लॉट दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mti2MN