नवी दिल्लीः Boat ने आपली नेक्स्ट जनरेशन च्या लाँचिंग सोबत भारतात स्मार्टवॉचच्या आपल्या रेंजचा विस्तार केला आहे. नवीन स्मार्टवॉच मोठी १.६९ इंचाची एचडी स्क्रीन सोबत येते. यात १० दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्मार्टवॉचला IP67 रेटिंग सुद्धा मिळाली आहे. ची किंमत आणि उपलब्धता बोट वर्टेक्सला २ हजार ४९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले आहे. हे फ्लिपकार्टच्या सोबत कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवर उपलब्ध होणार आहे. या स्मार्टवॉचला डीप ब्लू, अॅक्टिव ब्लॅक, रेजिंग रेड किंवा कूल ग्रे कलर व्हेरियंट मध्ये खरेदी करू शकतात. Boat Vertex चे स्पेसिफिकेशन्स बोट वर्टेक्स मध्ये १.६९ इंचाचा एचडी कॅपेसिटिव्ह स्कायर डिस्प्ले आहे. ही एक हाय टच इंटरफेस सोबत येते. स्मार्टवॉच वेगवेगल्या हार्ट रेट सेन्सर आणि एक SpO2 ट्रॅकिंग सेन्सरचा समावेश आहे. स्लीप पॅटर्न वर नजर ठेवण्यासाठी बिल्ट इन स्लीप ट्रॅकर दिले आहे. स्लीम मॉनिटर आपल्या झोपेला ट्रॅक करते. स्मार्टवॉच मध्ये गाइडेड ब्रिदिंग फीचर आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे फीचर हार्ट रेटला कमी करणे, आणि तणावाचा स्तर कमी करण्यात मदत करू शकते. Boat Crest App चा उपयोग करून युजर्स आपल्या बीएमआय आणि अॅक्टिविटी लेवलच्या आधारावर फिटनेस प्राप्त करू शकते. बोट वर्टेक्स मध्ये ८ बिल्ट इन स्पोर्ट्स मोड आहेत. यात चालणे, पळणे, सायकल चालवणे, स्किपिंग, बॅटमिंटन, बास्केटबॉल आणि फुटबॉलचा समावेश आहे. स्मार्टवॉचचा उपयोग डेली कॅलरी बर्न आणि स्टेप्सला ट्रॅक करण्यासाठी केला जातो. हे १०० हून जास्त फेस देते. एकदा चार्ज केल्यानंतर १० दिवसाची बॅटरी लाइफ मिळते. ही स्मार्टवॉच IP67-सर्टिफिकेशन सोबत येते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vSx95k