Full Width(True/False)

दिवाळीत स्मार्टफोनने करा DSLR सारखी फोटोग्राफी, हे गॅजेट्स येतील उपयोगी

नवी दिल्ली : दिवाळीत आपण सर्वचजण सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी आकर्षक फोटो काढत असतो. मात्र, स्मार्टफोनमध्ये एवढे चांगले फोटो येत नाही. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही, कारण आम्ही तुम्हाला अशा काही गॅजेट्सबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे शानदार होईल. विशेष म्हणजे या गॅजेट्सची किंमत खूपच कमी आहे. या गॅजेट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: कॅमेरा लेंस स्मार्टफोन कॅमेरा लेंसची क्षमता अनेकदा कमी असते. त्यामुळ रात्रीच्या वेळी, इनडोर फोटोग्राफी करताना समस्या येते. मात्र, तुम्ही कॅमेरा लेंसला डीएसएलआर सारखे बनवू शकता. बाजारात स्मार्टफोनसाठी अनेक चांगल्या कॅमेरा लेंस उपलब्ध आहेत. याचा वापर करून तुम्ही शानदार फोटोग्राफी करू शकता. गोरिल्ला गोरिल्ला ट्रायपॉडला तुम्ही खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. याचा वापर केल्यास फोटो अधिक चांगले येतील, कारण यामुळे कॅमेरा लेंस स्थिर राहते. गिम्बल गिम्बलला सोप्या भाषेत कॅमेरा स्टेबलाइजर म्हटले जाते. तुम्ही मूव्हिंग फोटोग्राफी देखील करत असाल तर गिम्बलमुळे शानदार फोटो येतात. प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये याचा वापर आधीपासूनच होत आहे. मात्र, लोक आता पर्सनल यूजसाठी देखील याचा वापर करत आहेत. सेल्फी स्टिक सेल्फी स्टिक बाजारात कमी किंमतीत उपलब्ध आहे. यासोबत, रिमोट देखील मिळतो. तुम्हाला जर घरात कुटुंबासोबत फोटो काढायचा असतील तर याचा उपयोग करून चांगले फोटो काढू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pCXDGN