नवी दिल्लीः मोटोरोलाने यावर्षी मार्चमध्ये स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनी नवीन डिव्हाइस घेवून येण्याची तयारी करीत आहे. रिपोर्टनुसार, नवीन डिव्हाइस चीनमध्ये नोव्हेंबर मध्ये उतरवला जावू शकतो. या डिव्हाइसला Moto Edge S30 नाव दिले जावू शकते. यात आधीच दमदार प्रोसेसर, डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा दिला जावू शकतो. फोनचे जास्तीत जास्त स्पेसिफिकेशंस लाँचिंग आधीच समोर आले आहेत. Moto G200 चे संभावित फीचर्स मोटो जी २०० स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या जागी 144Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले दिला जाणार आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत येईल. या फोनमध्ये ८ जीबी रॅम सोबत क्वॉलकॉमचे लेटेस्ट Snapdragon 888 प्रोसेसर दिले जाणार आहे. या फोनमध्ये इंटरनल स्टोरेज किती दिले जाणार यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सॉफ्टवेयर मध्ये फोन आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉयड ११ वर काम करणार आहे. त्यानंतर याला Android 12 चे अपडेट लवकरच मिळू शकते. 108MP चा कॅमेरा मिळेल फोटोग्राफीसाठी Moto G200 मध्ये १०८ मेगापिक्सलचा सॅमसंगचा ISOCELL इमेज सेंसर दिला जाण्याची शक्यता आहे. हा कॅमेरा सेंसर 4K व्हिडिओ 120fps वर रिकॉर्ड करू शकतो. हा सेन्सर Moto Edge 20 Pro मध्ये सुद्धा दिला गेला आहे. सोबत १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा सेंसर दिला गेला आहे. Moto G100 चे स्पेसिफिकेशंस Moto G100 स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश सोबत ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर सोबत 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळतो. यात एक क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक एलईडी फ्लॅश सोबत एक ToF सेंसर आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nn8iCE