Full Width(True/False)

Google Maps च्या 'या' फीचरमुळे वाढणार तुमच्या बाईकचा मायलेज, होणार पैशांची बचत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आजकाल सगळेच वापरतात. अशात, लवकरच एक नवीन वैशिष्ट्य गुगल मॅप्सद्वारे सादर करणार आहे. जे फीचर युजर्सना पर्यावरणास अनुकूल मार्ग शोधण्यात मदत करेल. म्हणजेच, लवकरच तुम्हाला Google Map वर सर्वात कमी इंधन वापर असलेल्या मार्गाचा पर्याय दिसेल. याशिवाय, सर्वात वेगवान मार्गाचा पर्याय देखील दिसेल. अशा परिस्थितीत, युजर्स या दोन्हीपैकी कोणत्या मार्गाने जायचे ते ठरवू शकतील. इको-फ्रेंडली मार्गाची निवड करून, युजर्स त्यांच्या कार आणि दुचाकीचा इंधन खर्च कमी करू शकतील. वाचा: इंधन खर्चात बचत शक्य : हे वैशिष्ट्य गुगलच्या ब्लॉग पोस्टमध्ये जाहीर करण्यात आले. त्यावेळी सांगण्यात आले होते की, Google Map चे नवीन मार्ग मॉडेल तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानाकडे जाणारा सर्वात वेगवान मार्ग दाखवेलच, पण त्या मार्गाचा पर्यायही तुम्हाला दिसेल, जे कमी इंधन खर्चात तुमच्या स्थानापर्यंत पोहोचू शकेल. हे इंधन बचत आणि अंदाजे आगमन वेळ यातील फरक देखील दर्शवेल. जर स्थानावर आगमनाची अंदाजे वेळ आणि इंधन कार्यक्षम मार्ग समान असतील, तर Google डीफॉल्टनुसार कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने काम करेल. गुगल मॅपचे नवीन फिचर अमेरिकेत लाँच : Google Maps चे नवीन वैशिष्ट्य अमेरिकेत वापरण्यासाठी उपलब्ध झाले आहे. हे अँड्रॉइड तसेच आयओएस उपकरणांसाठी आणले गेले आहे. पुढील वर्षापर्यंत गूगल मॅप वैशिष्ट्य युरोपसह इतर देशांमध्ये उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. Google Maps लाइट नेव्हिगेशन लवकरच : सायकलस्वारांसाठी लाइट नेव्हिगेशन लवकरच Google मॅप्सद्वारे सादर करण्यात येणार आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांमध्ये, बाइकिंगची दिशा देशभरातील सुमारे ९८ टक्के शहरांमध्ये वाढवली जाईल. लाईट नेव्हिगेशनच्या मदतीने सायकलस्वार मार्गाच्या तपशीलांमध्ये त्वरीत प्रवेश करू शकतील. यासाठी त्यांना फोनच्या स्क्रीनवर नेव्हिगेशन चालू करावे लागेल. गुगल लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनसह सायकलस्वारांसाठी नेव्हिगेशन आणणार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v2x1Qt