Full Width(True/False)

शानदार फीचर्ससह HONOR X30i आणि HONOR X30 Max लाँच, पाहा किंमत

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी ने आपले दोन डिव्हाइस आणि X30 Max ला चीनमध्ये लाँच केले आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याशिवाय शानदार कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर देखील मिळेल. या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. वाचा: HONOR X30i आणि X30 Max ची किंमत HONOR X30i च्या ६ जीबी+१२८ जीबी मॉडेलची किंमत १,३९९ युआन (जवळपास १६,४०० रुपये), ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत १,६९९ युआन (जवळपास १९,९०० रुपये) आणि ८ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत १,८९९ युआन (जवळपास २२,२२० रुपये) आहे. तर दुसरीकडे X30 Max च्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २,३९९ युआन (जवळपास २८ हजार रुपये) आणि ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २,६९९ युआन (जवळपास ३१,६०० रुपये) आहे. HONOR X30i आणि X30 Max चे स्पेसिफिकेशन HONOR X30i स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२३८८ पिक्सल आहे. तर X30 Max स्मार्टफोनमध्ये ७.०९ इंच फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२२८० पिक्सल आहे. दोन्ही फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. X30i मध्ये MediaTek Dimensity ८१० चिपसेट आणि X30 Max मध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर मिळतो. HONOR X30i आणि X30 Max चा कॅमेरा HONOR X30i स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळतो. तर X30 Max स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. दोन्हीमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. HONOR X30i आणि X30 Max ची बॅटरी HONOR X30i स्मार्टफोनमध्ये ४००० एमएएचची बॅटरी मिळते. तर मॅक्स व्हेरिएंटमध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. दोन्ही फोन्सची बॅटरी २२.५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि ५जी सारखे फीचर्स मिळतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Cw4Qfl